Breaking

Devendra Fadanvis : अमरावतीत काही चांगलं झालं की माझ्या आईला आनंद होतो !

 

Devendra Fadanvis said that my mother is happy when something good happens in Amravati : पायलट कुठेही असला, तरी इंजीन तेच आहे..!

Amravati : अमरावती विमानतळ आणि प्रवासी सेवेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ अमरावती शहरच नव्हे तर पूर्ण विभागाला या विमानतळाची प्रतीक्षा होती. अमरावतीकरांचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं आहे. अमरावती विमानतळ ‘फुलफेज’ तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

अमरावती विमानतळ परीसरात आज (१६ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अमरावती विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्याची धावपट्टी 3 हजार किमी करण्यात येणार आहे. विकासाचा आमचा वेग आहे. पायलट कुठेही असला तरी इंजीन तेच आहे. विदर्भाला व अमरावती विभागाला आम्हाला पुढे न्यायचे आहे. आमचं सरकार डबल बूस्टर आहे.

माझ्यावर अमरावतीचं कर्ज होतं. कारण माझी आई अमरावतीची आहे. अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की माझ्या आईला आनंद होतो आणि तो आनंद मी माझ्या आईला देत असतो. आधी हे काम थांबलं होतं. पण आता आमचं सरकार आल्यावर आम्ही ते पूर्णत्वास नेलं. अमरावतीमध्ये सुरू होत असलेल्या पायलट ट्रेनिंग सेंटरमुळे अंमरावतीचं नाव जगाच्या नकाशावर येणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Devendra Fadanvis : जेवढा घराच्या भूमिपूजनाचा आनंद, तेवढाच भाजप कार्यालयाचा !

अमरावती हे केवळ एक विमानतळ म्हणून ओळखलं जाणार नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र अमरावतीमध्ये आहे, ही एक नवी ओळख निर्माण होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशातील 7 टेक्सस्टाईल पार्क सुरू होत आहेत. पीएम मित्राअंतर्गत अमरावतीमध्ये एक टेक्सटाईल पार्क सुरू होत आहे. यामध्ये दोन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. विदर्भात समृद्धी महामार्गासोबत वाळवंट कोड सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्पसुद्धा विदर्भातून जात आहे. त्यामध्ये दहा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

Devendra Fadanvis ; ‘100 Days’ कृती कार्यक्रमाची माहिती 1 मे रोजी संकेतस्थळांवर येणार !

वैनगंगा नळगंगा हा प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळसुद्धा नष्ट होणार आहे. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेमध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. येणाऱ्या काळात अकोला, यवतमाळच्या विमानतळांचा विस्तारसुद्धा करण्यात येणार आहे.
येणाऱ्या काळात अमरावतीमध्ये आयटी पार्कसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.