Devendra Fadnavis said that we are looking at Modiji as the Prime Minister of 2029 : भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही
Nagpur : राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.. राज्य चालवताना सर्वांची विश्वासात घेऊनच काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंचं पूर्ण भाषण मी ऐकू शकलो नाही. मात्र मी जेवढं काही ऐकलं, त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोलले. त्यावर निश्चित आम्ही विचार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपुरात आज (३१ मार्च) मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधीकारी कोण, याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या टिकेबाबत विचारले असता मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत. यासाठी आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे. 2029 चे पंतप्रधान म्हणून आण्ही मोदीजींकडे बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही..
भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. ही सगळी मुगली संस्कृती आहे.. वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही उत्तराधीकारी निवडण्याची वेळ आली नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, तर माझा त्या विषयाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.
Shakuntala Railway : ब्रिटिश कंपनीकडून ‘शकुंतला’चा ताबा घेणार!
भोंग्यांच्या बाबतीत विचारले असता 100% जे नियमाच्या बाहेर असतील आणि सुप्रीम कोर्टांचा जो आदेश आहे.. या आदेशाचे तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल. कबरीच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. जी कबर ज्या ठिकाणी आहे, ही एसआयची प्रोटेक्टेड कबर आहे. आम्हाला औरंगजेब आवडो अथवा न आवडो कायद्याने साठ वर्षांपूर्वी त्याला प्रोटेक्शन मिळालं आहे. म्हणून त्याठिकाणी जो कायदा असेल, त्याचं पालन करणे आमची जबाबदारी आहे. पण औरंगजेबच्या कबरीचा उदात्तीकरण आम्ही होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.