Devendra Fadanvis : एरवी शांत असलेले फडणवीस समर्थक लोंढेंच्या टिकेने भडकले !

Maharashtra Pradesh Congress Chief Spokesperson Atul Londhe made a scathing attack on Devendra Fadnavis : शहराध्यक्ष बंटी कुकटे, आमदार प्रवीण दटके यांची गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार

Nagpur : भारतीय जनता पक्ष तसा शिस्तबद्ध पक्ष. या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयमी नेते. विरोधकांना शांतपणे पण तेवढ्याच चातुर्याने प्रत्युत्तर देणे, ही त्यांची शैली आहे. पण यावेळी मात्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक चांगलेच भडकले. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीसांवर X वरून जहरी टिका केली.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापवले आहे. धमकी दिल्याच्या दिवसानंतर कोरटकर फरार होता. त्याला तेलंगणा राज्यातील करिमनगर येथून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. कोरटकरला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील पडवेकर नामक कर्मचाऱ्याने पळून जाण्यात आणि लपवून ठेवण्यात मदत केल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला. यावर फडणवीसांनी खुलासा करावा, अशी मागणीही लोंढेंनी केली होती.

Chief Minister’s Relief Fund : पुन्हा नव्या आशेने बहरले ‘त्या’ चिमुकल्याचे जीवन !

एरवी अतुल लोंढे अधूनमधून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टिका करत असतात. सोशल मिडियावरून ते व्यक्त होत असतात. पण मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपचे इतर पदाधिकारी त्यांना तेवढे गांभीर्याने घेत नाहीत. पण यावेळी लोंढेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टिका केल्याने भाजपला ती चांगलीच झोंबली. आणि भाजपने यावेळी जहाल प्रतिक्रिया दिली. गणेशपेठ पोलिस ठाण्यात अतुल लोंढे यांच्या विरोधात आमदार प्रवीण दटके आणि भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी तक्रार दाखल केली.

Harshawardhan Sapkal : खाजगीकरणामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

लोंढेंनी केलेले आरोप खोटे आहेत. पडवेकर नामक कुणीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करत नाही. हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा घाट घातला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीवरून राज्यात आधीच असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेसचे लोक आगीत तेल टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. लोंढेच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.