So why didn’t Sharad Pawar complain that time? निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना चार वेळा ईव्हीएम हॅक करण्याचं चॅलेंज केलं
Nagpur : ‘विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला दोन लोक भेटायला आले होते. १६० जागा निवडून देतो, असे ते मला बोलले होते’, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल (१० ऑगस्ट) नागपुरात ‘मीट द प्रेस’ मध्ये केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिप्रश्न केला आहे. ‘जर तुम्हाला असे कुणी लोक भेटले, तर मग तुम्ही त्याची तक्रार पोलिसांत, निवडणूक आयोगाकडे का केली नाही?’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शरद पवार जबाबदार नागरिक आहेत, अशा प्रकाराची त्यांनी तक्रार करायला हवी होती. हा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर सलीम जावेदची स्टोरी आहे. अशा स्टोरीज सांगणे पवारांनी बंद केले पाहिजे. आता हे सर्व लोक मिळून षडयंत्र रचत आहेत. हेच नाही तर कुठल्याही फसवणुकीचा प्रकार होत असेल तर त्याची तक्रार पोलिसांत केली पाहिजे, हे सामान्य माणसालाही कळते. मग पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ते कळू नये, याचे आश्चर्य वाटते.
Vijay Wadettiwar : एसआयटी नेमली म्हणजे कारवाई झाली असं नाही !
आजपर्यंत ईव्हीएम कुणीही हॅक करू शकलं नाही. आगामी निवडणुका डोळ्यांसममोर ठेऊन ते इकडे – तिकडे बोलत आहेत. पण निवडणूक आयोगाच्या समोर जायला तयार नाहीत. निवडणूक आयोगाने तर त्यांना पत्र दिले, जाहिर निमंत्रण दिले आहे. पण हे लोक तेथे बोलत नाही. इकरे बाहेर गोळ्या सोडा आणि पळून जा, अशी या लोकांची निती आहे, असे म्हणत फडणवीसांनी टिका केली.
Chandrashekhar Bawankule : मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या, मग हरल्यावर आरोप करू नका !
ओबीसींची ताकद काय आहे, हे आता त्यांच्या लक्षात येत आहे. वर्षानुवर्षे त्यांनी ओबीसी समाजाला पाण्यात बघितलं. कोणत्याही योजना ओबीसींपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. केवळ भाषणाचे राजकारण त्यांनी केले. आता ओबीसी समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर ते यात्रा काढत आहेत. नुसती यात्रा काढून चालणार नाही. तर ओबीसींच्या पाठीशी ठामपणे उभे आहात, हे कधीतरी दाखवून दिले पाहिजे. ज्यावेळी ओबीसींवर संकट येतं, त्यावेळी यांची भूमिका ‘नरोवा कुंजरोवा’ची असते, असा आरोप फडणवीस यांनी केला.