To understand what basic service is, ones has to come to Anandvan : स्वतःच्या पलिकडचा विचार केल्यास समाजात सकारात्मक काम करणे शक्य
Anandvan Warora Chandrapur : महारोगी सेवा समिती आनंदवनच्या या प्रकल्पाला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आयोजित कृतज्ञता सोहळ्यामध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला, त्यांचं एकत्रिकरण या माध्यमातून होते आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मला दिले, हे माझे सोभाग्य आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथीन आनंदवनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, मानवी संवेदना याची व्याख्या ही बाबांच्या कार्यामध्ये पहायला मिळते. मुलभूत सेवा काय असते, हे समजून घेण्यासाठी आनंदवनलाच यावं लागेल. खऱ्या अर्थाने ज्या काळात बाबांनी काम सुरू केले, ते अतिशय कठीण काम होतं. समाजात मान्यता तर सोडाच. पण तिरस्कार होता. त्या काळात बाबांनी हे काम सुरू केले. हीच त्यांच्या कार्याची महती आहे.
व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आदीवासी कल्याण मंत्री अशोक उईके, माजी राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोऱ्याचे आमदार करण देवतळे, वणीचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, हेमंत पांडे, मिनाक्षी गुप्ता, CA रचना रानडे, डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, कौस्तुभ आमटे आणि आनंदवन परिवारजन उपस्थित होते.
साधनाताई आमटे यांनी आत्मचरीत्रामध्ये लिहिलेलं आहे की, मोटारीतून आलेले लोक त्यांच्या कुटुंबीयांना गाडीच्या खालीही उतरू देत नव्हते. अशी अवस्था तेव्हा होती. आज ७५ वर्षानंतर अनेक प्रतिथयश लोक आनंदवनात येतात. प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये लोकांना समाधान मिळते. ७५ वर्षांची ही वाटचाल महत्वाची आहे. हा भाग त्या काळात मागासलेला होता. तेव्हा गडचिरोली चंद्रपूर एकच जिल्हा होता. फार सोयी नसताना असा प्रकल्प बाबांनी हातात घेतला आणि तो चालवून दाखवला. आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा हे बाबांच्या प्रेरणेने सुरू झालेले प्रकल्प डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी पुढे नेले.
MLA Shweta Mahale : ॲग्रीस्टॅकबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा!
कुष्ठरोग्यांची सेवा हे या संस्थेचं मुळ कार्य. पण त्याशिवाय समाजातील विविध क्षेत्रांत कामे करण्यात आली. समाजसेवेच्या विविध क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. समाजात वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून संवेदना समाजात पोहोचवल्या. समाजात संवेदना तयार करण्याचे बहुमूल्य काम विविध प्रकल्पांच्या माध्यमातून झालं. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या पलिकडचा विचार करतो, तेव्हाच तो समाजात सकारात्मक काम करू शकतो. बाबा आमटेंनी विविध उपक्रमांच्या माध्यामातून देशभरात संवेदना तयार केली, ती अभिमान वाटेल अशीच आहे, या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबा आमटेंच्या कार्याचा गौरव केला.