Will solve the problems of organizations working for the disabled said cm Devendra Fadanvis : विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगाच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न
Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग कल्याणाची धोरण निश्चिती केली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार, शिक्षण अशा सर्व गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य शासनानेदेखील अशा प्रकारच्या अनेक योजना आखल्या आहेत. दिव्यांगासाठी असलेला राखीव निधीचा योग्य विनियोग व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रेशीमबाग येथील मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, क्रीडा संचालनालय आणि स्वर्गीय प्रभाकर दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पर्धास्थळी भेट दिली, तसेच स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
Manikrao Kokate : कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले, 1 एप्रिलपासूनअंमलबजावणी
अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ही अतिशय उत्साहवर्धक ठरणारी गोष्ट आहे . दिव्यांगाकरता काम करणाऱ्या संस्था आहेत. त्या संस्थांच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणीदेखील दूर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. या संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींवरदेखील मात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. अनेक क्रीडा प्रकारांत त्यांनी पदके पटकावली आहेत. त्यांचाही येत्या काळात यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. कुठल्याही खेळात जीत व हार यापेक्षा सांघिक भावना महत्त्वाची असते. ज्यांच्यामध्ये संघ भावना तयार होते, ते जगाच्या कुठल्याही क्षेत्रात गेले तरी मागे वळून पाहत नाहीत. स्पर्धेत सहभागी होणे हेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
CM Devendra Fadnavis : हिरव्या रंगाची चादर जाळल्याचा अपप्रचार
राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, स्वर्गीय प्रभाकरराव दटके ट्रस्टचे प्रमुख सुभाष राऊत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले दिव्यांग खेळाडू यावेळी उपस्थित होते.