No Plans to Discontinue Any Scheme, Says Government : नैसर्गीक आपत्तीमुळे राज्यावर मोठा भार
Nagpur : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ‘आनंदाचा शिधा’, ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ या दोन महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या होत्या. या योजना आता एकापाठोपाठ बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये महायुतीतील अंतर्गत कुरघोडी कारणीभूत आहे, अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरावर सुरू आहेत. पण ‘कोणतीही योजना बंद करण्याचा विचार नाही’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना विराम दिला आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुठल्याही योजना बंत करण्याचा आमचा विचार नाही. सर्व योजना आम्ही चालवणार आहोत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही. फ्लॅटशीपमधील कुठलीही योजना बंद होणार नाही. या फक्त चर्चा आहेत, त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
Local Body Elections : काँग्रेस-राष्ट्रवादी भेटले, शिवसेना वेटिंगवर!
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विचारले असता, कोण कोणासोबत जाईल, हे आत्ता सांगता येत नाही. मात्र कुणीही कोणासोबतही गेलं तरी महाराष्ट्रात भाजप आणि महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणार आहे. या निवडणुकांमध्ये आम्हाला मोठे यश येईल, असा आमचा विश्वास आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा विभागवार ठरवला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका याचा आढावा घेण्यात आला. मुंबई वगळता सर्व विभागांच्या नियोजनाच्या बैठका आम्ही पूर्ण केल्या आहेत. आमच्या टीमने काय नियोजन केले, हे जाणून घेणे आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिशा देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, यासाठी हा सर्व दौरा होता. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात प्रचंड उत्साह आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.








