Breaking

Devendra Fadanvis : घरगुती विजेचा खर्च कमी होणार; महावितरणचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा !

 

Price reduction proposal submitted to State Electricity Regulatory Commission : दरकपातीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर

Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यान्वित होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. या योजनेमुळे घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा लाभ होणार असल्याचे महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी जाहीर केले.

पाठक यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीमुळे 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी वीज दर सध्याच्या 7.65 रुपये प्रति युनिटवरून 5.87 रुपये प्रति युनिटपर्यंत म्हणजेच 23% कमी होतील. तसेच, 101 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वीज दर 13.49 रुपये प्रति युनिटवरून 11.82 रुपये प्रति युनिटपर्यंत म्हणजेच 12% कमी होतील. एक एप्रिल 2025 पासून ग्राहकांना या दरकपातीचा लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागेल.

Vidarbha farmers : ‘शेतकरी ओळख क्रमांक’ अनिवार्य; ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू

महावितरणने या दरकपातीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास घरगुती व औद्योगिक ग्राहकांच्या वीज खर्चात लक्षणीय घट होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होईल, ज्यामुळे महावितरणच्या वीज पुरवठ्याचा सरासरी दर कमी होईल. सध्या सरासरी दर 9.45 रुपये प्रति युनिट आहे, तो 2029-30 पर्यंत 9.14 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली येण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra State Biodiversity Board : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ कार्यालयात कर्मचाऱ्यांचा छळ !

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाठक यांनी सांगितले की, सौर ऊर्जा निर्मितीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल आणि महावितरणला सुलभ दराने वीज मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सवलती आणि प्रोत्साहन योजना सुरूच राहतील, तसेच त्यांना क्रॉस सबसिडीची गरज भासणार नाही.

मुख्य मुद्दे
१. सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे वीज दर कमी होण्याचा लाभ घरगुती व औद्योगिक ग्राहकांना.
२. 100 युनिट वीज वापरणाऱ्यांसाठी 5.87 रुपये प्रति युनिटपर्यंत दरकपात.
पुढील पाच वर्षांत वीज पुरवठ्याचा सरासरी दर 9.14 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली येणार आहे.