Breaking

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule : प्रजासत्ताकदिनी राजपथावर हवा श्रीक्षेत्र रिद्धपूरचा चित्ररथ

Government should involve Shrikshetra Riddhapura in Republic Day program on Rajpath : महानुभावपंथीयांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur श्रीक्षेत्र रिद्धपूरचा चित्ररथ प्रजासत्ताकदिनी राजपथावर असावा, अशी मागणी कवीश्वरकुलाचार्य महंत श्रीकारंजेकरबाबा यांच्या नेतृत्वातील महानुभावपंथीयांच्या शिष्टमंडळाने शासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नुकतेच त्यांना निवेदन दिले आहे. सरकार याबाबत काय भूमिका लागते याकडे महानुभावपंथीयांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला दिल्लीतील राजपथावर देशातील विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात येतात. श्रीक्षेत्र रिद्धपूर मराठी साहित्याची गंगोत्री मानले जाते. येथे मराठी आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिखाणस्थळ आहे. श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभाव पंथाची काशी असून, या नगरीने सुमारे ८५० वर्षांपासून महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जतन केले आहे. येथे १२व्या शतकात निर्माण झालेले धवळे, लीळाचरित्र व इतर मराठी साहित्य येथील महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरले.

Election Commission : ओबीसी उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या १० पट मोबदला द्यावा

आज या ठिकाणी पहिले मराठी भाषा विद्यापीठ सुरू झाले आहे. श्रीक्षेत्र रिद्धपूचे महात्म्य लक्षात घेता कर्तव्य पथावर चित्ररथ असावा, असे शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘विद्वत परिषदे’त या विषयाचा ठराव पारित केला होता, त्यानुसार हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राने प्रजासत्ताक दिन-२०२६ साठी ‘अभिजात मराठी’ ही संकल्पना राबवून अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रिद्धपूरचा चित्ररथात समावेश करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

Chandrashekhar Bawankule : कामे झाली असती तर लोक माझ्याकडे कशाला आले असते?

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक जडणघडणीत श्रीक्षेत्र रिद्धपूरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी रिद्धपुरात निर्माण झालेले आद्यग्रंथ लीळाचरित्र व धवळे हे दस्तऐवज महत्त्वपूर्ण ठरले. या ऐतिहासिक नगरीचा चित्ररथ प्रजासत्ताकदिनी राजपथावर झळकल्यास मराठीचा वारसा आणि विकास याचे संतुलन साधले जाईल, असे प्रतिपादन कवीश्वरकुलाचार्य महंत श्रीकारंजेकरबाबा यांनी केले.