Chief Minister criticises neglect of urban development over 70 years : अकोल्यात जाहीर सभा, प्रामाणिक हातात महापालिका देण्याचे आवाहन
Akola देशातील सुमारे ५० टक्के नागरिक शहरांमध्ये वास्तव्यास असून ६५ टक्के जीडीपी शहरांतून निर्माण होतो. तरीही सात दशके शहरी विकासाकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ग्रामीण विकासासोबतच शहरी विकासालाही समान महत्त्व दिल्याचा दावा केला.
अकोला महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. अकोला शहराच्या धार्मिक, भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र, हा निधी प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेची सत्ता सक्षम, पारदर्शक आणि प्रामाणिक लोकांच्या हातात असणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.
Asaduddin Owaisi : ओवैसी म्हणतात, ‘मी स्वतःला नेता मानत नाही’!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अकोल्याचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव असलेल्या श्री राज राजेश्वर मंदिराच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर विकासाचा आराखडा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीही दिला जाईल.
हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी १३८ कोटी रुपये, शहरातील डीपीआरमधील सर्व रस्त्यांसाठी विशेष निधी तसेच अकोला विमानतळाच्या विकासासाठी २०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विमानतळाच्या धावपट्टीचे २,८०० फूट विस्तारीकरण करण्यात येणार असून त्यामुळे अकोल्याच्या औद्योगिक, व्यापारी तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींना मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Akola Municipal Corporation Election : ‘ज्येष्ठांना काम नसते, त्यांना प्रचारात फिरवा’
शहराच्या पुढील २५ वर्षांच्या विकास आराखड्यानुसार जिगाव प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी ६०० कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २२१ कोटी रुपयांचे काम सुरू असून पुढील टप्प्यात ५२१ कोटी रुपयांचे काम हाती घेतले जाणार आहे.
भूमिगत गटार योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, सीसीटीव्ही यंत्रणा, न्यू तापडिया नगर उड्डाणपूल (३७ कोटी रुपये) तसेच महापालिकेची नवीन इमारत उभारण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.








