Chief Ministers clear message on local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश
Wardha : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्धार आहे. असे असले तरी या निवडणुकात भारतीय जनता पक्षाने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करावं, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. ते वर्धा येथे आयोजित भाजपच्या महामंथन मेळाव्यात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, सुरुवातीला जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुका होतील. या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचा भाग म्हणून एकत्र लढायचं आहे. स्थानिक पातळीवर थोडीफार अडचण असेल तर कार्यकर्त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. मात्र शक्यतो महायुतीमध्येच निवडणुका लढाव्यात. कुठे महायुती होणार नसेल, तरही आपल्याला आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही, असं त्यांनी बजावलं.
Local Body Elections : नगरपरिषद निवडणुकांसाठी ७९ मतदान केंद्रांची वाढ!
तसेच त्यांनी 2017 च्या अनुभवाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे त्या वेळी सत्तेत असूनही रोज आपल्या पक्षावर टीका करत होते. पण आपण तसे वागायचं नाही. कुठेही थेट लढत झाली, तरी ती मैत्रीपूर्ण असावी. पण अंतिमतः भाजपचं वर्चस्व सिद्ध झालं पाहिजे, असं ते म्हणाले.
फडणवीसांनी पक्षातील स्थानिक पातळीवरचे वादही यावेळी स्पष्टपणे मांडले. काही जिल्ह्यांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये लहान सहान वाद आहेत. हे वाद फार मोठे नाहीत, ते आपण मिटवू शकतो. भाजप हे एक कुटुंब आहे. जसं दोन भावांमध्ये मतभेद होतात, तसं इथेही होतं. पण निवडणुकीच्या तोंडावर हे वाद बाजूला ठेवून एकसंघपणे लढणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं.
पक्षाला कमजोर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पक्षच खड्ड्यात घालेल, हे लक्षात ठेवा. पक्षप्रेम आणि शिस्त यातूनच यश मिळतं, हे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना इशाराही दिला. राज्यात भाजपसाठी सध्या सकारात्मक वातावरण असून, सर्व भागांत कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं तयार झालं आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं. “
Mahayuti Government : महाविकास आघाडीने सुरू केलेली योजना अडचणीत!
आपण जेव्हा ठरवतो, तेव्हा मोठं काम करून दाखवतो. याचं उदाहरण म्हणजे 22 जुलै रोजी झालेलं रक्तदान शिबिर. शिवसेनेनं याआधी एका दिवसात 25 हजार बाटल्या रक्त जमा केल्या होत्या, पण आपल्याकडे अध्यक्षांनी आदेश दिल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका दिवसात तब्बल 78 हजार बाटल्या रक्त गोळा केल्या. हे आपल्या संघटनशक्तीचं मोठं उदाहरण आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.








