Fadanvis clarification on Madhuri Misal, Sanjay Shirsat controversy ; माधुरी मिसाळ, संजय शिरसाट वादावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
Mumbai ; राज्य सरकारमधील महायुतीच्या मंत्र्यांमध्ये निर्माण झालेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या विभागीय आढावा बैठकीवरून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर राज्यमंत्री मिसाळ यांनी पत्र लिहून उत्तर दिलं, आणि आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांच्या परवानगीशिवाय विभागीय आढावा बैठक घेतल्याचं समजताच, संजय शिरसाट नाराज झाले होते. त्यांनी राज्य मंत्र्यांना पत्र लिहून उघडणारा जी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना पत्र लिहून सांगितलं की, मला राज्यमंत्री या नात्याने मला बैठक घेण्याचा अधिकार आहे.
Devendra Fadanvis : भानुताईंच्या संस्कारांतून नितीन गडकरींना ऊर्जा मिळाली !
या पत्रामुळे कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यातील अधिकारांच्या मर्यादा, संवादाची पातळी, आणि सत्ताधाऱ्यांतील समन्वय यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या वादावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले , अशा स्वरूपाचं पत्र लिहून वाद निर्माण करणं योग्य नाही. अशा बाबतीत एकमेकांशी थेट संवाद साधावा. काही अडचण असेल तर ती थेट माझ्यापर्यंत यावी.
फडणवीस म्हणाले, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच शासनाचे भाग असतात. मंत्र्यांना जे अधिकार आहेत तेच अधिकार राज्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे यामध्ये कोणताही संभ्रम नाही. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतले जाणार असतील, तर ते कॅबिनेट मंत्र्यांच्या संमतीशिवाय घेता येणार नाहीत.त्यांनी स्पष्ट केलं की, राज्यमंत्री बैठका घेऊ शकतात, पण त्यामधील निर्णय धोरणात्मक स्वरूपाचे असतील, तर मंत्र्यांची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे दोघांनी सामंजस्याने काम केलं पाहिजे.
Maharashtra Government : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत दीड लाख बेरोजगारांची थट्टा !
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली. या भेटीवरही फडणवीस यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले, उद्धवजींचा वाढदिवस आहे, राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यात राजकारण कशाला पाहायचं? आमच्याही शुभेच्छा आहेत. अशा वैयक्तिक भेटींमध्ये राजकारण शोधणं योग्य नाही.
फडणवीस यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या मनात काय आहे, ते विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसेल. काही नेत्यांच्या मनात जे आहे, तेच राज्याच्या जनतेच्या मनात आहे असं समजणं चुकीचं आहे.
___