Fadnavis said, we dont care if Thackeray brothers come together : फडणवीस म्हणाले, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं आम्हाला फरक पडत नाही
Mumbai : आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहत नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊ. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही. त्यांनी एकत्र यावं आणि किक्रेट, टेनिस खेळावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही असा टोलाही मुख्यमंत्री लगावला आहे.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द केले. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्याने हिंदी सक्तीची करा अशी शिफारस केली. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाला. हे दुटप्पी लोक आहेत. याचं सत्तेतले रुप वेगळं आणि विरोधातले रुप वेगळं आहे.’
Hindi language controversy : हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला; तरीही ठाकरे बंधू एकत्र येणारच!
ठाकरे बंधू एकत्र न येण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय असा आरोप होत आहे यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणून मी जीआर काढला नाही. दोन भावांना एकत्र येण्यासाठी मी रोखलंय का? त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, हॉकी खेळावी, स्विमिंग करावं जेवण करावं, काहीही करावं आम्हाला काहीही फरक पडत नाही.’
Sanjay Raut : लुटारू सरकारला रोज चाबकाचे फटके मारावेत, असा यांचा कारभार !
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ राज्यात त्रिभाषा सूत्र स्वीकारायचं की नाही यावर आम्ही एक समिती नेमली आहे. ती समिती ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्रा तील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही.’
दरम्यान राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्या संबधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द केले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. हिंदीला विरोध म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईत मोर्चा काढणार होते. विरोधाचा मोर्चा रद्द झाला असला तरी ते विजयी मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
___