Breaking

Devendra Fadnavis Politics : विधानसभेत थांबवले, परिषदेत सावरले!

 

Dadarao Keche nominated for Legislative Council : फडणविसांनी दादाराव केचे याना दिलेले प्रॉमिस पाळले

Nagpur स्वीय सहायक सुमित वानखेडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा विधानसभा जिंकलेले दादाराव केचे यांना थांबवले. केचे यांची नाराजी दिल्लीपर्यंत पोहोचली. पण अचानक एक दिवस वानखेडेंच्या प्रचारात दादाराव केचे दिसले. असे का झाले, याची प्रचिती रविवारी आली. भाजपने परिषदेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत केचे यांचे नाव झळकले आणि सारे काही स्पष्ट झाले.

विद्यमान खासदार अमर काळे यांचा पराभव करून दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे ठेवला होता. पुन्हा एकदा संधी मिळेल, याची खात्री केचे यांना होती. पण याठिकाणी फडणविसांचे पीए सुमित वानखेडे यांना लढायचे होते. त्यामुळे फडणविसांच्या, ‘पीएंना आमदार करण्याच्या’ परंपरेत केचेंचा अडथळा ठरणार होता.

Sandip Joshi’s name for Legislative Council : संदीप जोशी म्हणत असतील ‘तेरे जैसा यार कहाँ’!

फडणविसांनी नाराजीची चिंता न करता सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली. दादाराव केचे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बंडाची शक्यता निर्माण झाली. अशात सुमित वानखेडे यांचे गणीत बिघडू शकते, असे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे केचे यांची समजूत घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, याची फडणविसांना जाणीव झाली.

सुमित वानखेडेंचा प्रचार सुरू असताना एक दिवस दादाराव केचे स्टेजवर दिसले. त्यानंतर फडणविसांनी काहीतरी आश्वासन दिल्याशिवाय शक्त नाही, हे लक्षात आले. सुमित वानखेडे तर विजयी झाले. पण केचे यांनी बंडखोरी केली असतील तर हा विजय सोपा नव्हता. त्यामुळे केचे यांचे पुनर्वसन अपेक्षितच होते.

Devendra Fadnavis : मोदींच्या भेटीसाठी फडणवीस दिल्लीत, शिंदे गट अस्वस्थ

तक्रारी झाल्या म्यान!
सुमित वानखेडे आर्वी मतदारसंघासाठी गेल्या दहा वर्षांपासून तयारी करत होते. त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळणार याची शक्यता होतीच. पण दरम्यानच्या काळात वानखेडेंचे आर्वी मतदारसंघात सक्रीय होणे केचे यांना खटकले होते. त्यांनी काही तक्रारी देखील फडणविसांकडे केल्या होत्या. मात्र परिषदेचे आश्वासन मिळाल्यामुळेच दादाराव केचे यांनी सर्व तक्रारी म्यान केल्या होत्या, असे आता बोलले जात आहे.