The Chief Minister trusts us to support Mumbaikars : मुंबईकरांचा पाठिंबा आम्हालाच मुख्यमंत्र्यांचा विश्वास
Mumbai : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठीचा विजय मेळावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, ‘ हा मराठी चा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती असे सांगत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबईतला माणूस आमच्याच पाठीशी आहे, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मुंबईत आज ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. साधारण 19 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू विजयी मिळाव्यानिमित्त एकत्र आले. हाच संदर्भ देत राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही, ते फडणवीस यांनी करून दाखवलं, असा टोल लगावला.
Ravikant Tupkar : बैल नाही म्हणून औत ओढणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला ‘क्रांतिकारी’चा आधार!
आता राज ठाकरेंच्या याच विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीचा मुद्दा लावून धरलेला असताना फडणवीस यांनी ही हिंदुत्त्वाचा उल्लेख करत मुंबई जिंकण्यासाठीच्या रणनीती दाखवून दिली. तसेच मला सांगण्यात आलं होतं की, विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण झालं, असा टोलाही त्यांनी लगावला.
Chief Minister Youth Training Scheme : सहा हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना सप्टेंबरनंतर ‘नो एंट्री’!
मराठी भाषेबद्दल न बोलता. आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला सरकारमध्ये घ्या, आम्हालाच निवडून द्या, असं ऐकायला मिळालं. हा मराठी चा विजेयोत्सव नव्हता, ही रुदाली होती, असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे नाव न घेता लगावला.त्यांच्या काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पालिकेवर असलेली सत्ता यांचा उल्लेख करत या 25 वर्षांत ते काहीच करू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आम्ही मुंबईचा जो चेहरामोहरा बदलवला त्यांच्या काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पत्राचाळीतल्या, अभ्यूदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर त्याच ठिकाणी दिलं. याचीच असूया त्यांच्या मनात आहे, असे फडणवीस म्हणाले.
Sanjay Raut vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं, संजय राऊत कडाडले
जनतेला सर्व माहीत असतं. मुंबईतला मराठी माणूस असो किंवा अमराठी माणूस, हे सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. त्यासोबतच आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्त्वाचा पण अभिमान आहे. आमचं हिंदुत्त्व सर्वांना घेऊन चालणारं आहे, असे म्हणत फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा राहील हे दाखवून दिले.
_____