Breaking

Devendra Fadnavis Uday Samant : उद्योजकांनी ‘या’साठी मानले सरकारचे आभार!

District Industrialists Association thanks Government : जिल्हा उद्योजक संघटनेने केले निर्णयाचे स्वागत

Wardha जिल्हा इंडस्ट्रियलिस्ट असोसिएशनने लघुउद्योजकांना महागडी वीज परवडणारी नसल्याचे सोलर ऊर्जेचा लाभ देण्याची मागणी केली होती. आता शासनाने मुख्यमंत्री लघुउद्योग सौर छत योजनेअंतर्गत उद्योजकांना कमी दरात वीज देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल संघटनेने मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

इतर राज्यांच्या तुलनेत विजेमुळे राज्यातील लघउद्योजकांना उत्पादन खर्च जास्त येतो. त्यांना स्पर्धेत टिकता येत नाही. त्याकरिता सोलर ऊर्जेचा लाभ इंडस्ट्रीला द्यावा, याबाबत मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना निवेदन दिले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्याचे नवीन उद्योग धोरण कसे असावे, याची आढावा बैठक नागपूर येथे घेतली होती.

Farmer Unique ID : ज्याच्या नावावर जमीन; त्यालाच युनिक आयडी!

त्या बैठकीत जिल्हा इंडस्ट्रियलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी नवीन धोरणामध्ये सौर ऊर्जेचा लाभ असावा, अशी आग्रही भूमिका मांडली होती. सौर ऊर्जेमुळे उद्योगांना कसा लाभ शकतो, स्पर्धेत कसे टिकता येते, हे समजावून सांगितले होते. त्यावेळी उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले होते.

आता राज्यात मुख्यमंत्री सौर छत योजना कार्यान्वित झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता १० एचपीपासून ते १००० एचपीपर्यंत आपल्या कंपनीच्या छतावर किंवा खाली जागेवर सोलर पॅनल लावून दिले जाणार आहे. त्यातून होणारी वीजनिर्मिती अंदाजे ४.६० पैसे प्रतियुनिट बिल आकारले जाणार आहे. हे दर विद्युत वितरण कंपनीच्या दरापेक्षा कमी आहे. पुढील २० वर्षांपर्यंत सोलरची देखभाल व दुरुस्ती संबंधित कंपनी करणार आहे.

Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavhan : ‘बावनकुळे सरांसोबत’ रवींद्र चव्हाण राज्याच्या दौऱ्यावर!

या योजनेचा कुठलाही अतिरिक्त खर्च किंवा सोलर पॅनल खरेदीचा, लावायचा खर्च उद्याेजकांना करावा लागणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कारखानदारांनी योजनेचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करावा. ही योजना म्हणजे उद्योजकांना उद्योग चालविण्यासाठी मिळालेली संजीवनी होय.