Breaking

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर आमदारांना सक्त ताकीद

Disputes in mahayuti, avoid statements that opposition get piece of the pie : महायुतीत वाद, विरोधकांना आयते कोलीत मिळेल अशी वक्तव्य टाळा

Mumbai: महायुतीमध्ये वाद होईल तसेच विरोधकांना आयते खोलीत मिळेल असे कोणतेही वक्तव्य करू नका. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आपले एखादे चुकीचे वक्तव्य अडचणीचे ठरू शकते. तसेच विरोधकांना त्यावरून संधी मिळते, तेव्हा हे प्रकार टाळा अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील वाचाळवीर आमदार आणि मंत्र्यांनाही दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही सूचना केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात सतर्क राहण्याच्याही सूचना दिल्या. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील काही आमदार विविध मुद्द्यांवरुन एकमेकांवर दोष देताना दिसत आहेत. समोरच्यावर टीका करताना वेगळी पातळी गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आमदारांना, ‘महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा’, अशी स्पष्ट सूचना केली. तसेच असे वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. महायुतीच्या या संदेशा सोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश देण्यात आले.

Amravati airport : अमरावती-मुंबई विमानसेवा अडकली तांत्रिक कचाट्यात!

तसेच सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी अधिक सक्रिय राहावे. आपल्या मतदारसंघात जनतेच्या संपर्कात राहून कामे करावीत. सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता, सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे, अशा सूचना पण सर्व आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.