Breaking

Dhananjay Munde : माणिकरावांसाठी नैतिकतेचे मानक वेगळे?

Are the moral standards different for Manikrao : धनंजय मुंडेंचा राजीनामा परंतु कोकाटेंना अभय

Mumbai : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसाठी नैतिकतेचे मानक वेगवेगळे आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला. परंतु त्यांच्याच पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवूनही ते मंत्रीमंडळातील खुर्चीवर चिकटून आहेत. एकीकडे दोष सिद्ध झालेला असताना माणिकराव कोकाटे यांना अभय देणार्या अजित दादांचे नैतिकेचे मानक माणिकरावांसाठी वेगळे आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोराष देशमुख हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याने राजीनामा दिला जाणार नाही, अशा शब्दात अजित पवार मुंडे यांचा बचाव करीत होते. धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड हेच खरे  सूत्रधार असल्याचे सीआयडीने तपासात समोर आणल्यानंतर मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला.. परंतु अजित दादांचे अत्यंत विश्वासू असलेले मुंडे यांच्यासाठी नैतिकतेचे मानक वेगळे लावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांचा संबंध नाही, दोष सिद्ध झाल्याशिवाय कुणावर आरोप करणे चुकीचे आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असा शब्दच्छल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या विश्वासू शिलेदाराचा राजीनामा थांबविण्याचा प्रयत्न करीत होते.

Dhananjay Munde’s resignation accepted : राज्यातील ‘मुंडे’ प्रभावाला ओहोटी?

अखेर वाढत्या दबावामुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याने धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. नैतिकतेच्या आधारावर आपण राजीनामा देत असल्याचे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांनी ही नैतिकता असल्याबद्दल होकार भरला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता व्यक्तीसापेक्ष असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्यावरील गुन्हा सिद्ध न झाल्याने  राजीनाम्याची गरज नाही म्हणारे अजित पवार गुन्हा सिद्ध झालेल्या माणिकराव कोकाटे यांना मात्र अभय देत आहे. मुख्यमंत्री कोट्यातून खोटी माहिती देऊन सदनिका बळकविल्याचा आरोप कोकाटेंवर होता. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात कोकाटे यांना दोषी ठरविले व दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे कायद्यानुसार त्यांची आमदारकी व मंत्रीपद दोन्ही जाते. परंतु नैतिकेचे मानक माणिकरावांसाठी वेगळे ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसरे माणिक मात्र सुरक्षित राहिले आहेत.

Vijay Wadettiwar : धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, विजय वडेट्टीवार झाले संतप्त