Breaking

Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!

MVA sloganeering, aggressive protest on the steps of the legislature : विरोधकांची घोषणाबाजी; विधीमंडळाबाहेर आक्रमक आंदोलन

Mumbai मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे दुसरे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर सरकारवर दडपण आले आणि मुंडेंनी राजीनामा दिला. तो स्वीकारण्यातही आला. पण विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस मात्र विरोधकांच्या आंदोलनाने गाजला.

काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘महायुतीचे दोन गुंडे… कोकाटे-मुंडे… कोकाटे-मुंडे’, ‘दाग अच्छे है… मुंडे, कोकाटे सच्चे है’, ‘आकाचा आका…महायुतीचा बोका’ अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले.

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन!

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड याला अटक झाली. तोच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. असा ठपका सीआयडीने ठेवला. त्यानंतर मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यामुळे त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नैतिकता राखून मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तर मुंडे यांनी तब्येतीच्या कारणाने राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन!

माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक जिल्ह्यातील अजित पवार यांचे विश्वासू म्हणून पाहिले जाते. यामुळे त्यांचे मंत्री पद व आमदारकीवरही ग्रहण लागले आहे.