Chhagan Bhujbal got angry at the journalists questions! : पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळ चांगलेच संतापले!
Nashik : धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार का, यावरुन सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि सध्या मंत्रिमंडळात असलेले छगन भुजबळ यांना याबाबत विचारण्यात आले. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं सांगितलं. मात्र या मुद्द्यावर अधिक खोलात विचारणा होताच ते पत्रकारांवर चिडल्याचं पाहायला मिळालं.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुन्हा मुंडेंना मंत्रिमंडळात संधी मिळणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. यावर भुजबळ यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आणि निर्णय घेण्याचं अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगितलं.मात्र काही पत्रकारांनी भुजबळांनी पूर्वी केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत प्रश्न विचारला. त्या वक्तव्यानुसार, जर मुंडेंना क्लिन चीट मिळाली तर राजीनामा देतील, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं , यावरून चर्चा रंगली. या प्रश्नावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
Tribal Pardhi Society : आदिवासी पारधी समाजाला हवे उच्चपदस्थांचे पाठबळ !
त्यांनी स्पष्ट केलं की धनंजय मुंडे यांच्यावर दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप होते. एक होते संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित, आणि दुसरे होते कृषी खात्यातील. त्यांनी जेव्हा क्लिन चीट मिळाली, ते कृषी खात्यातील आरोपांमध्ये मिळाली. त्यामुळे या दोन गोष्टी गोंधळात टाकू नयेत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जर कोणी मुद्दामहून चुकीची माहिती पसरवत असेल, तर आपण त्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी एका झटक्यात खोडून काढले तथाकथित अर्थतज्ज्ञांचे आरोप !
भुजबळ पुढे म्हणाले की, सार्वजनिक आयुष्यात काम करत असताना कधी चुका होतात, कधी आरोप होतात. पण त्यावर अंतिम निर्णय न्यायालयच घेतं. आरोप खोटे की खरे, हे ठरवण्याचं काम न्यायप्रक्रियेतूनच होतं आणि जो निर्णय येतो तो सर्वांनी मान्य करणं गरजेचं असतं.छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियांमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की, धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाचा निर्णय वरच्या पातळीवरच होणार आहे. मात्र, पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नांवरून ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.