Munde family’s dominance in the state is at stake : धनंजय मुंडेंचा राजीनामा; बीडच्या घटनेचे ठरले निमित्त
Mumbai गेल्या चार दशकांपासून राज्याच्या राजकारणावर मुंडे घराण्याचा प्रभाव राहिला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांच्याकडे आशेने बघितले गेले. पण पक्षाची शिस्त मोडणाऱ्या विधानांमुळे त्यांना बॅकफूटवर जावे लागले. अशावेळी धनंजय मुंडे यांनी हा वसा चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी व या गुन्हेगारीला संरक्षण देण्याच्या आरोपावरून त्यांची मंत्रीमंडळतून गच्छंती झाली. त्यांनी राजीनामा दिला आणि तेवढ्याच तत्परतेने तो स्वीकारण्यातही आला. मात्र, या राजीनाम्यामुळे मुंडे घराण्याच्या राजकीय प्रभावक्षेत्राला आहोटी लागण्याची शक्यता आहे.
ऐंशीच्या दशकात राज्यात भाजपचे फारसे प्रस्थ नसताना बीड जिल्ह्यातील वंजारी समाजातील तरुण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचे संकुचित प्रस्थ वाढविण्यास सुरूवात केली. राज्यातील ओबीसी समाजाला भाजपशी जोडण्याची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपची प्रभा वाढत गेली. नव्वदच्या दशकात आपल्या नेतृत्वाने भाजपवर पूर्ण वर्चस्व गाजविणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना १९९५ मध्ये युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होण्याची संधी मिळाली. तेथून मुंडे घराण्याच्या राजकीय उदयाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.
Prashant Koratkar Vs. Indrajeet Sawant : प्रशांत कोरटकरविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!
भाजपवर पूर्ण प्रभूत्व गाजविल्यानंतर देशाच्या पातळीवरही गोपीनाथ मुंडे यांनी आपली एक प्रतिमा तयार केली होती. यामुळे २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले. परंतु अचानकपणे झालेल्या मृत्यूने गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास अर्धवट राहिला. गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रछायेत तयार होणाऱ्या धनंजय मुंडेंनी राजकारणात घोडदौड सुरू केली. प्रारंभी भाजपात असलेले धनंजय मुंडे यांचे गोपीनाथ मुंडे घराण्याशी मतभेद निर्माण झाले. त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP Sharad Pawar प्रवेश केला.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक!
शरद पवार यांनी त्यांच्यावर कृपा दाखविली. मंत्री, विरोधी पक्षनेतेपद दिले. मुंडेंनी आपला प्रभाव निर्माण केला. परळी मतदारसंघात त्यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले. पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीतही पराभूत झाल्या. त्यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांना पक्षाने उमेदवारीच दिली नाही. अखेर पंकजा मुंडे यांना कसेबसे विधान परिषदेत यावे लागले.