Dhangar community : एसटी प्रवर्गाचे आरक्षण तातडीने अंमलात आणा, अन्यथा तीव्र आंदोलन

Demand for immediate implementation of ST category reservation : धनगर समाजाचा इशारा, हक्कांपासून वंचित ठेवल्याचा आरोप

Motala धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा असंतोषाचा सूर उमटला आहे. समाजबांधवांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत एसटी प्रवर्गातील आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

धनगर समाज हा भटकंती करणारा, वाड्यावर-वस्तीवर राहणारा समाज असून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ३६ क्रमांकावर या समाजाला आरक्षण दिले असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. मात्र, शासनाने अद्याप या आरक्षणाची अंमलबजावणी न केल्याने समाज हक्कापासून वंचित राहिला असल्याची खंत यावेळी व्यक्त झाली.

Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांसाठी दिल्लीत गेले, सुरजागडवर चर्चा करून परतले

“एसटी प्रवर्गातील आरक्षणाचा हक्क हा घटनात्मक आहे. हा न्याय तातडीने मिळावा, अन्यथा शासनाला रस्त्यावर उतरलेल्या समाजाच्या रोषाचा सामना करावा लागेल,” असा इशारा समाजबांधवांनी दिला.

Ravindra Chavhan : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वाहनावर सोयाबीन फेकण्याचा प्रयत्न

या निवेदनावर रमेश धुनके, गोपाल काटे, रामभाऊ शिंगाडे, शांताराम वाघ, संदीप सहावे, रामेश्वर काळंगे, एकनाथ आयनार, चंदन मार्कड, लहू सुरळकर, अंबादास चाटे, भागवत पाटील, गजानन धनके, मंगेश मोरे, राजू सावळे, सुरेश मोरे, मोहन बाजोडे, शिवदास सहावे, विजय खोंदले, देवदास पाचपोर, सुधाकर सुशिर, पुंजाजी खोदले, अमित वसतकार, संजय कासे, अनिल धुनके, संतोष वसतकार, अनंता सोनाग्रे, निलेश पाचपोर, राजेंद्र वैतकार, मनोहर खोंदले, विठ्ठल सुशीर, एकनाथ सहावे, सुनील गोमकर यांच्यासह शेकडो समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. धनगर समाजाच्या या निवेदनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.