Protesters climbed a tower demanding dhangar reservation : जानेफळमध्ये धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा
Janefal धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला आता ग्रामीण भागातूनही तीव्र प्रतिसाद मिळू लागला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जानेफळ येथेही आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले आहे.
सारंगपूर येथील धनगर समाजाचे नेते गजानन बोरकर यांनी २४ मार्चपासून बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. देऊळगाव साकर्शा रोडवरील सरस्वती विद्यालयासमोरील टॉवरवर सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास चढत त्यांनी “आरक्षण मिळाल्याशिवाय खाली उतरणार नाही” असा ठाम इशारा शासनाला दिला.
Narhari Zirwal : झिरवळ प्रकरणाचा ‘पेनड्राइव्ह’ समोर आला तर ३ मंत्र्यांच्या विकेट पडतील
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. मेहकर येथील तहसीलदारांनीही घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
दरम्यान, गजानन बोरकर हे यापूर्वीही विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन करत चर्चेत आले होते. मेहकर येथील तहसील कार्यालय परिसरातील टॉवर तसेच सोनाटी रोडवरील टॉवरवर चढून त्यांनी आंदोलन केले होते. तसेच तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयासमोरही त्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते.
Eknath Shinde Shivsena : दिल्ली बैठकीनंतर जिल्ह्यात खळबळ; गटबाजी, नाराजी आणि सूचक हालचाली
जानेफळ येथील या आंदोलनाला स्थानिक धनगर समाज बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून, टॉवर परिसरात मंडप टाकून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्य शासनाने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








