Road Block Protest by the Community for ST Reservation : सरकारला दिला इशारा – “आरक्षण न दिल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही!”
Motala धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सकल धनगर समाज बांधवांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले. “धनगर समाजाला न्याय द्या”, “एसटी आरक्षण लागू करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनकर्त्यांनी तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. निवेदनात शासनाने तातडीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे, अन्यथा येत्या काळात एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत धनगर समाजाला ३६ क्रमांकाने अनुसूचित जमाती प्रवर्गात स्थान दिले असताना, अद्यापही शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
Gram Rozgar Sahayak : जी.आर. काढूनही अंमलबजावणी नाही; ७ महिन्यांचे मानधन थकले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा वर्षांपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्यापही पाळले गेले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
Local Body Election : पहिले नगर परिषद, नंतर जिल्हा परिषद निवडणूक
या आंदोलनात समाजबांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. गोपाल काटे, रमेश धुनके, शांताराम वाघ, डॉ. शरद काळे, संदीप सहावे, रामेश्वर काळंगे, एकनाथ आयनर, दिलीप व दीपक बिचकुले, बाबुराव व विजय सोन्नर, दगडू आयनर, विजय व नंदू खोदले, कैलास सुशीर, अनिल गोंदले, योगेश जुमडे, सतीश व अरविंद कचोरे, शिवा लवंगे, राजू सावळे, विशाल व मधुकर धुनके, गजानन चहाटे, संजय येळे, वासुदेव शिंदे, मिलिंद जयस्वाल आदींचा सहभाग होता.