Maharashtra SC, ST Commission Vice Chairman Dr. Dharampal Meshram warns officials : डॉ. धर्मपाल मेश्राम यांचा पारधी समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा
Nagpur : नागपूर येथील शासकीय निवासस्थान रवीभवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषद घेण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पिडीत अन्यायग्रस्तांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र एस.सी, एस.टी. आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनातील बेजबाबदार व विशेष करून पारधी समाजाच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. या परिषदेला राज्याच्या 28 जिल्ह्यांतील पिढीत पारधी बांधव वर्षानुवर्षांपासून प्रलंबित प्रकरणे घेऊन आले होते. आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून धर्मपाल मेश्राम यांच्याकडे समाजबांधवांनी तक्रारी मांडल्या. पारधी समाज बांधवांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू, असा इशारा डॉ. मेश्राम यांनी यावेळी दिला.
Dapoli Politics : विरोध संपला, विश्वास वाढला: संजय कदम यांची योगेश कदमांना साथ !
राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांच्या तक्रारी डॉ. मेश्राम यांनी ऐकून घेतल्या. पीडित पारधी बांधवांची 156 प्रकरणं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आली. सर्व प्रकरणे प्राध्यान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले. सदर प्रकरणे हाताळण्यास विलंब करणाऱ्या दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. पारधी बांधवांना मुद्दामहून त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार, असा इशारा त्यांनी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील उळे तालुका उत्तर सोलापूर येथील बोगस एनकाऊंटरमधील मृत विनायक देवीदास काळे यांचा नाहक बळी गेलेला आहे. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना देण्यात आलेले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून शासन दरबारी न्याय मागणारी काळे यांची बहिण विमल व आई पुनाबाई यांना नक्की न्याय मिळेल. सरकारकडून संबंधित पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
Shirpur ZP School : शिरपूर येथे भरली आजी-माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अनोखी शाळा !
वेळ पडली तर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मृत विनायक देवीदास काळे व इतर साथीदारांवर खोट्या दरोड्याचे प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने त्या सर्वांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. ही बाब धर्मपाल मेश्राम यांच्या निदर्शनास विमल काळे यांनी आणून दिली. सर्व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी विमल काळे यांनी आयोगाकडे केली.
आदिवासी पारधी समाजासाठी इनामी, सरकारी गायरान जमिनी द्याव्या. तसेच आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना अद्याप नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, यासंदर्भातील निवेदन राजश्री चव्हाण यांनी आयोगाकडे दिले. त्याचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहे.
Vijay Wadettiwar : योजना लागू केली तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का?
परिषदेत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे, पारधी समाजाचे ज्येष्ठ नेते बबनराव गोरामन, साहित्यिक समाजसेवक नामदेव भोसले यांच्यासह नागपुरातून आशिष पवार, अनिल पवार, सोलापुरातून कश्मिर शिंदे, आशा भोसले, राणी शिंदे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्री चव्हाण, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कोमल शिंदे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे, बाळासाहेब भोसले बार्शी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र सचिव नकुल चव्हाण, सचिन शिंदे, सिद्धेश्वर शिंदे पंढरपूर, देवाप्पा शिंदे पंढरपूर, सुरेश पवार करमाळा, उपदेश भोसले बारामती व जेष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण सहभागी झाले.