Sharad Pawar is frustrated without power : भाजप प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला संताप
Nagpur राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याशिवाय भाजपच्या अनेक आमदार-खासदारांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांनी देखील शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन आलेल्या शरद पवारांची सत्तेच्या विना तडफड सुरु झाली. त्यांना वैफल्य आले आहे. सत्तेविना त्यांच्या मनाला निराशा आली आहे. त्याच नैराश्यातून त्यांनी शाह यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले, अशी टीका प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Ajit Pawar : अजित दादांनी ‘या’ विश्वासू शिलेदारावर दिली शिर्डीतील शिबीराची जबाबदारी !
शरद पवार यांनी देशाचे लोकप्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. सत्ता गेल्यामुळे ते निराश झाले आहेत. याच निराशेतून अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवारांनी केल्याचे दिसते आहे. त्यांनी मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले होते. मात्र त्यांना जनतेतून कोणत्याही पद्धतीचे महत्व मिळाले नाही व सत्तेत प्रवेशाचीदेखील संधी न मिळाली नाही, असा टोला मेश्राम यांनी लगावला आहे.
Nagpur municipal corporation: नागपूर मनपातील जुने रेकॉर्ड रद्द होणार
महाराष्ट्राच्या जनतेने फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारत शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेतृत्वाला झिडकारले आहे. हे पचत नसल्यामुळे शरद पवारांच्या तोंडातून अशा पद्धतीचे वक्तव्य येत आहेत. महाराष्ट्राची जनता शरद पवारांच्या कार्यपद्धतीला, त्यांच्या नेतृत्वाला जाणून आहे व पुढील निवडणूकीत जनताच त्यांना आणखी एक धडा शिकवेल असा दावा ॲड.मेश्राम यांनी केला.