37700 people made emergency calls : MERS प्रणाली ठरतेय प्रभावी; अडचणीच्या वेळी होतोय लाभ
Akola जिल्ह्यात महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (MERS) अंतर्गत डायल 112 व पोलिस हेल्पलाइन प्रभावीपणे कार्यरत आहे. 1 सप्टेंबर 2017 पासून सुरू झालेल्या या प्रणालीचा नागरिक मोठ्या प्रमाणावर उपयोग करत आहेत. 9 सप्टेंबर 2017 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत डायल 112 वर एकूण 37,700 तातडीचे कॉल प्राप्त झाले. प्रत्येक तक्रारीवर त्वरीत कार्यवाही करत पोलीस मदत तत्काळ उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डायल 112 प्रणालीमुळे आपत्कालीन प्रतिसाद वेळ मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. 2023 मध्ये 7,000 तक्रारींसाठी सरासरी प्रतिसाद वेळ 9 मिनिटे 40 सेकंद होता. 2024 मध्ये तक्रारींची संख्या 19,913 वर पोहोचली असली, तरी सरासरी प्रतिसाद वेळ 8 मिनिटे 14 सेकंदांपर्यंत घटवण्यात यश आले आहे. यामुळे मदत अधिक वेगाने मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mahayuti Government : लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना सुरू
MERS प्रणालीतून जलद मदत पोहोचवली जाते. पोलीस तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवत आहेत. 2023 मध्ये 222, तर 2024 मध्ये 316 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना MERS प्रणालीसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
3 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 6 टप्प्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिले जात आहे. 19 मार्च 2024 पर्यंत अकोला जिल्ह्यातील 184 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना या प्रशिक्षणाचा लाभ होईल.
आपत्कालीन घटनांमध्ये नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चव्हाण सिंह यांनी सांगितले की, MERS प्रणालीमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढली आहे आणि मदत तत्काळ पोहोचवण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.
Prataprao Jadhav : पत्रकारांच्या रेल्वे सवलतीसाठी प्रयत्नशील
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक अभय हंगे, शहर पोलीस निरीक्षक गणेश जुनगुने, डायल 112 चे पोलीस अधिकारी विजय पाटील, संदीप कारखेले, पोलीस निरीक्षक बी. के. शिवशंकर, मनिषा विजय चौधरी आणि एस. एस. एस. बेश्या यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.








