Breaking

Digitization of documents : बुलढाण्यात एका क्लिकवर मिळणार ११७ वर्षांचे अभिलेख!

117 years of records will be available in Buldhana with one click : ‘सहज प्रणाली’मुळे ऐतिहासिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन; नागरिकांना मोठी सोय

Buldhana जिल्ह्यातील १८६८ ते १९८५ या कालखंडातील ११७ वर्षांचे ऐतिहासिक अभिलेख आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागातील या मौल्यवान नोंदींचे डिजिटायझेशन करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाली आहे.

या उपक्रमामुळे जुने नोंद दस्त, मिळकत व्यवहार, फेरफार अभिलेख व इतर नोंदी आता ‘सहज प्रणाली’ या शासनमान्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून थेट मिळू शकणार आहेत. ही सुविधा नागरिक, वकील, बँका तसेच शासकीय यंत्रणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
डिजिटायझेशनमुळे नागरिकांना ऐतिहासिक नोंदी शोधण्यासाठी कार्यालयीन चकरा माराव्या लागणार नाहीत. ई-प्रणालीमुळे व्यवहार सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होतील असे जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी सांगितले.

Uddhav Balasaheb Thackarey : बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धवसेना आक्रमक

१८६८-१९८५ या कालावधीतील हजारो नोंदी सहज उपलब्ध हाेणार आहेत. त्यामुळे अभिलेख कक्षात फेरफटका टळणार, कार्यालयीन चकरा कमी हाेणार आहेत. जुने फेरफार व हक्कनोंदी ऑनलाइन मिळणार आहेत. महसूल, न्यायालय, नगरपरिषद यंत्रणांसाठी सोय हाेणार आहे.

या सर्व नोंदी कागदी स्वरूपात असून, कालांतराने त्या झिजत चालल्या होत्या. त्यांचे जतन, स्कॅनिंग करून सुरक्षित ठेवणे आणि जनतेला जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज होती. ‘सहज प्रणाली’तून वर्षनिहाय व दस्त क्रमांकानुसार नोंदी शोधणे सोपे होणार आहे.

Politics in gram panchayat : ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी आत्मदहनाचा इशारा!

मालमत्तेच्या फेरफार नोंदी करताना जुने नोंद दस्त आवश्यक असतात. डिजिटायझेशन झाल्यामुळे ही प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि सोपी होईल. नागरिक, बँका, वकील आणि शासकीय विभागांना आवश्यक कागदपत्रे त्वरित मिळतील.त्यामुळे, नागरिकांना माेठा दिलासा मिळणार आहे.