Dilip Sananda : सन्मान झाला नाही तर स्वबळावर लढू, सानंदांचा नारा

Ajit Pawar NCP is ready to contest on its own strength, if neglected : खामगावात घेतली बैठक, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Khamgao महायुतीतील मित्र पक्षाने सन्मानजनक जागा दिल्या तर आपण सोबत निवडणूक लढवू; अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरेल व कार्यकर्त्यांना सत्तेत बसवेल, असा ठाम निर्धार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केला.

गांधी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सर्कलनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सानंदा बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांना सर्व शक्तीनिशी सामोरे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून पक्षाचा झेंडा फडकविण्याचा संकल्प घ्या,” असंही ते म्हणाले.

State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीवर बोलताना सानंदा म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी लोकांच्या समस्या हाताळल्या पाहिजेत आणि जनतेत मिसळून काम केले पाहिजे. तरुण नवमतदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडला गेला पाहिजे, असंही सानंदा म्हणाले.

Cabinet meeting : कॅबिनेट बैठकीत ओल्या दुष्काळाच्या निर्णयाची प्रतीक्षा !

या बैठकीला खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, लायसन कमिटीचे सभापती विलाससिंग इंगळे, बांधकाम सभापती गणेश ताठे, संचालक श्रीकृष्ण टिकार, ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख, मनोज वानखडे, जयराम मुंडाले, माजी सरपंच गणेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहित राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.