Congress leader meets E Shinde again : शिंदेंच्या भेटीनंतर पुन्हा एकदा शिवसेना प्रवेशाची चर्चा
Buldhana शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी ठाम शब्दांत फटकारले आहे. “जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त करत कोणत्याही प्रकारच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
माजी आमदार दिलीप सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आ. संजय गायकवाड यांच्या फार्महाऊसवर सदिच्छा भेट घेतली. या भेटीला खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाडही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
यावर प्रतिक्रिया देताना सानंदा म्हणाले, “एकनाथ शिंदे माझे जुने मित्र आहेत. आम्ही पूर्वी एकत्र काम केले आहे. मात्र याचा अर्थ पक्षांतर नव्हे.” त्यांनी स्पष्टपणे कोणत्याही गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारली. तथापि, “राजकारणात काहीही घडू शकते,” हे लक्षात घेतले तरीही सध्या सानंदा यांच्या एका भेटीने बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे आणि नव्या चर्चांना उधाण आले आहे.