Breaking

Dilip Sananda : माजी आमदाराची या मागणीसाठी रक्ताने स्वाक्षरी!

Demand for creation of Khamgaon district and farmer loan waiver : खामगाव जिल्ह्याची निर्मिती व शेतकरी कर्जमाफीसाठी निवेदन

Khamgao बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र खामगाव जिल्ह्याची निर्मिती करावी व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. या मागण्यांसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय धरणे आंदोलन झाले. विशेष म्हणजे सानंदा यांनी स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी करीत निवेदन दिले.

खामगाव जिल्ह्याच्या मागणीशी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या भावना जुळलेल्या आहेत. बुलढाणा जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने घाटाखालच्या तालुक्यांना प्रशासनिक सुविधा पोहोचण्यासाठी खामगावसह लाखनवाडा तालुक्याची निर्मिती गरजेची असल्याचे सानंदा यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणुकीत महायुतीने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात काँग्रेस, सेवाभावी संस्था, युवक संघटना व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलाही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे मोर्चादरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.

Dilip Sananda : सानंदांच्या पोस्टरवर फडणवीस, शिंदे, पवार!

डॉ. तब्बसुम हुसैन, हाजी रशीद खाँ, मनोज वानखडे, सरस्वतीताई खासने, विजय काटोले, पंजाबरावदादा देशमुख, सुरेशभाऊ वनारे, डॉ. सदानंद धनोकार, सुभाष पेसोडे, संजय झुनझुनवाला, अशोकबाप्पू देशमुख, बबलु पठाण, किशोरआप्पा भोसले आदींसह शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाले.

मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डपासून सुरू झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत गेला. टॉवर चौकात झालेल्या धरणे आंदोलनात “खामगाव जिल्हा झालाच पाहिजे”, “शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Dilip sananda : सानंदा म्हणतात, “जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं”

दिलीप सानंदा यांनी आपल्या रक्ताने स्वाक्षरी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांना निवेदन पाठवले. शेकडो आंदोलकांनीही निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.