Dirty politics : माझी भीती वाटते म्हणून माझ्या आईचा फोटो वापरून…

MLA Rohit Pawars attack on the opposition : आमदार रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

Mumbai : पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपकडून त्यांच्या आईचा फोटो राजकीय प्रचारात वापरण्यात आल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले, “माझी आई राजकारणात नाही, समाजकारण करते. भाजप आज कोणत्या स्तरावर गेली आहे हे पाहून वाईट वाटतं. माझ्या आईला राजकारणाचं काहीही देणंघेणं नाही, तरी तिचा फोटो वापरून भाजप असे गलिच्छ राजकारण करत असेल, तर याचा सरळ अर्थ असा की मला समोर जायला भाजप घाबरते.”

पुण्यात निलेश घायवळ (Nilesh Ghayawal) प्रकरणानंतर राजकीय नेत्यांचा त्यामागे हात असल्याच्या चर्चांमुळे वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “आईला मध्ये आणता का? तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी थेट लढायची? मी राजकारणात आहे. तुम्हाला काय काढायचं ते काढा, आम्हालाही काय बोलायचं ते बोलू दे. पण माझ्या आईचा वापर राजकीय फायद्यासाठी करणं म्हणजे नीचपणाचा कळस आहे.”

Loan waiver : लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, म्हणून आश्वासन द्यावंच लागतं !

रोहित पवार पुढे म्हणाले, “माझ्या आईबद्दल विचारलं, तर आमचे विरोधकसुद्धा म्हणतील त्या साध्या, सरळ स्वभावाच्या आहेत. समाजकारण करतात, राजकारण नाही. त्यांना राजकीय कटकारस्थानं काय असतात हे कळतही नाही. पण तरीही भाजप अशा स्तरावर जात असेल, तर ते स्वतःच्या कमकुवतपणाचं चिन्ह आहे.”

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला जोड देत रोहित पवार यांनी योगेश कदम यांच्या बंदुकीच्या परवान्याबाबतही भाष्य केलं. “योगेश कदम यांनी लायसन्स सभापती राम शिंदे यांच्या सांगण्यावरून दिलं, हे स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे. मग भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !

निलेश आणि सचिन घायवळ प्रकरणाचा संदर्भ:
निलेश आणि सचिन घायवळ हे जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी असून, सचिन घायवळ पुण्यातील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवार यांच्या प्रचारात सक्रीय होते. त्यानंतर काही स्थानिक राजकीय मतभेद झाल्याच्या चर्चा सध्या जामखेड परिसरात रंगल्या आहेत.

रोहित पवारांच्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर भाजपकडूनही उत्तराची प्रतीक्षा आहे. मात्र त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा निलेश घायवळ प्रकरणाने राजकीय वादळ निर्माण केले असून, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला तापू लागला आहे.

_____