Clashes between ruling party and opposition in Legislative Council : दिशा सलियान मृत्यू प्रकरणा ठाकरे गट-भाजप आमने सामने
Buldhana दिशा सालीयान मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या मुद्द्यावरून आमने सामने आले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. दरम्यान चित्रा वाघ यांच्यावर शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके यांनी आता जोरदार हल्लाबोल केला आहे.
सभागृहाची गरिमा धाब्यावर बसून चित्रा वाघ सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा व अपयश लपवण्यासाठी वाट्टेल ते बरळत असल्याच्या शेळके म्हणाल्या आहेत. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजपाची पद्धत आहे. त्याच पद्धतीने भाजप आमदार चित्रा वाघ बोलत असतात, अशी टीकाही त्यांनी केली.
Ajit Pawar : स्वराज्य सप्ताह, अभिजात मराठी भाषा दिनानंतर राष्ट्रवादी करणार महाराष्ट्र महोत्सव !
महायुतीचे सरकार जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून स्व. संतोष देशमुख हत्याकांड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत झालेला मृत्यू आणि महिलांवरील वाढते अत्याचार अशा अनेक घटनांनी राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा सिद्ध झाला आहे. त्यातच अडीच महिन्यात सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच एका मंत्रीचा राजीनामा घ्यावा लागला आहे, असं त्या म्हणाल्या.
CM Devendra Fadnavis : दंगलीतील आरोपी दंगलीचे ‘सत्य’ कसे शोधणार?
इतर मंत्री वाट्टेल ते बोलून सरकारचे वाभाडे काढत आहे. हा नाकर्तेपणा व अपयश लपविण्यासाठी आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी न्यायप्रविष्ठ दिशा सालियन प्रकरण जाणीवपूर्वक समोर आणल्या जाते. त्यावर चर्चा घडवून आणली जाते, असा घणाघात जयश्री शेळके यांनी केला. सभागृहाची प्रतिष्ठा धाब्यावर बसून बोलणाऱ्या चित्रा वाघ यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’. कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी सत्य लपणार नाही. सर्व महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहे, असंही शेळके म्हणाल्या.