District Bank case : जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात बच्चू कडूंची कुरघोडी!

Bacchu Kadu has obtained a stay from the Mumbai High Court : संचालकपदाच्या अपात्रतेचे प्रकरण; शिक्षेवर मिळविली स्थगिती

Amravati एका न्यायालयीन प्रकरणात शिक्षा सुनावल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांना संचालकपदावरून अपात्र करण्याचे प्रकरण विभागीय सहनिबंधकांकडे सुरू आहे. मात्र, ज्या मुद्यावर हे प्रकरण सुरू आहे, त्या शिक्षेलाच बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविल्याची माहिती आहे. त्यामुळे विभागीय सहनिबंधकांकडे केवळ सुनावणीची औपचारिकता बाकी असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.

मंगळवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, विभागीय सहनिबंधक रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. बबलू देशमुख गटातील संचालक हरिभाऊ मोहोड आणि अन्य ११ संचालकांनी बच्चू कडू यांना संचालकपदावरून अपात्र करण्यासाठी प्रकरण दाखल केले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने कडूंना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

Sudhir Mungantiwar : आणीबाणीच्या लढ्यातील सैनिकांना २० हजार रुपये द्या !

बँकेच्या उपविधीनुसार, एका वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास संचालक अपात्र ठरतात. याच पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधकांनी ७ फेब्रुवारी रोजी कडूंना नोटीस बजावली होती. विभागीय सहनिबंधकांनी त्यांना १० मार्चपर्यंत अपात्रतेबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, यादरम्यान कडूंनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आणि सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यामुळे विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Harshvardhan Sapkal : मी शेंगा खाल्ल्या नाही, टरफलं उचलणार नाही !

बच्चू कडू यांना अपात्र करण्याच्या सुनावणीसाठी विभागीय सहनिबंधकांनी १८ मार्च ही अंतिम तारीख निश्चित केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची अधिकृत प्रत त्यांना प्राप्त नसल्याने मंगळवारी सुनावणीदरम्यान ती सादर करता आली नसती. योगायोगाने विभागीय सहनिबंधक रजेवर असल्याने ही सुनावणी टळली असून निर्णयही लांबणीवर पडला आहे.