व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र District Bank election : बिनविरोध संचालकांमुळे राजकीय समीकरणे बदलणार?

District Bank election : बिनविरोध संचालकांमुळे राजकीय समीकरणे बदलणार?

Possibility of the Vice-Chairman post going to Washim in the district bank election: जिल्हा बँक निवडणूक : उपाध्यक्षपद वाशीमकडे जाण्याची शक्यता; पुनर्वसनाच्या चर्चांना उधाण

Akola अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत अध्यक्षांसह तब्बल १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी माघारीच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांना पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच मोठ्या पदांची ग्वाही दिल्याने उपाध्यक्षपद वाशीम जिल्ह्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते. कर्ज वितरणासह विविध वित्तीय सेवांमध्ये अग्रस्थानी असलेल्या या बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सहकार पॅनेलची सत्ता कायम आहे. गतवर्षी सत्तेला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. यंदाच्या निवडणुकीतही विरोधकांनी प्रयत्न केले, पण सत्ताधारी गटाने आपली पकड कायम राखली.
या निवडणुकीत एकूण ५५ उमेदवारांनी माघार घेतली, तर उर्वरित १९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. ३० मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

Maharashtra politics : ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक? एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या प्लॅनला भाजपचा रेड सिग्नल!

महिला जागांवर चुरस, मतांत फरक नगण्य
महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत तीन उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली. विजयी उमेदवार सत्ताधारी गटातील असून, मताधिक्य अत्यल्प राहिले. एका उमेदवाराला ८५१, तर दुसऱ्याला ८४९ मते मिळाली. विरोधी उमेदवाराला ३५१ मते मिळाल्याने, मजबूत उमेदवार असता तर लढत अधिक चुरशीची झाली असती, असे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

अध्यक्षपदावर ‘नवा चेहरा’ की पुनरावृत्ती?
२१ पैकी अनेक सदस्य नव्याने निवडून आल्याने बँकेच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्षपदासाठी डॉ. संतोषकुमार कोरपे यांची पुनर्निवड होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, यंदा डॉ. कोरपे यांचे पुत्र डॉ. जयराज कोरपे हेही संचालक म्हणून निवडून आले आहेत.

Iran war strategy : “होर्मुझ बंद राहिली तरी चालेल, पण युद्ध थांबवा”

माघारीवरून वाद, प्रशासनाकडे खुलासा मागणी
उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेदरम्यान काही घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे खुलासा मागण्यात आला. काही दिग्गजांना थेट निवडणूक टाळण्यासाठी ‘अविरोध’ रणनीती वापरण्यात आल्याची चर्चा होती. तसेच कर्ज पुनर्गठन प्रकरणातील चौकशी पुढे नेणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याची बाबही चर्चेत राहिली

error: Content is protected !!