District Bank Notice Case : जिल्हा बँकेच्या नोटीस प्रकरणावर ६ ऑगस्टला सुनावणी

A fine was imposed until the documents were submitted : विभागीय सहनिबंधक कार्यालयाची स्वतंत्र कार्यवाही सुरूच

Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बजावण्यात आलेल्या दंडात्मक नोटीसप्रकरणी न्यायालयाने सध्या आदेशासाठी प्रकरण तात्पुरते बंद केले असले, तरी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने यावर स्वतंत्र कार्यवाही सुरू ठेवत ६ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली आहे. त्याच दिवशी बँकेचे संचालक आनंद काळे यांच्या अपात्रतेप्रकरणीही सुनावणी होणार आहे.

सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधक कार्यालयाने चौकशी समिती नेमली होती. मात्र, जिल्हा बँकेकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे बँकेला नोटीस बजावण्यात आली आणि कागदपत्रे सादर करेपर्यंत दंड ठोठावण्यात आला. बँकेने ही कारवाई न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती.

Akola Congress : अकोल्यातील तिघांना काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी

या संदर्भात झालेल्या सुनावणींमध्ये २२ जुलै रोजी न्यायालयाने प्रकरण तात्पुरते आदेशासाठी ‘क्लोज’ केले आहे. तथापि, विभागीय सहनिबंधक कार्यालयाला न्यायालयाकडून कोणताही स्पष्ट आदेश प्राप्त न झाल्याने, विभागीय पातळीवर प्रक्रिया सुरू ठेवत पुढील सुनावणीची तारीख ६ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

Humani worm : हुमणी अळीचा प्रकोप; उद्धव सेनेच्या नेत्या पोहोचल्या शिवारात

दरम्यान, संचालक आनंद काळे यांच्यावर बँक व्यवहारात विविध अनियमितता केल्याचा आरोप ठेवत त्यांना अपात्र ठरविण्याची नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणावर २९ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत त्यांनी काही कागदपत्रे सादर केली असून, त्यांनी वकिलांची नियुक्ती करण्यासाठी परवानगीही मागितली आहे. अपात्रतेच्या या प्रकरणावरदेखील आता ६ ऑगस्ट रोजीच सुनावणी होणार आहे.