Breaking

Divisional Commissioner of Nagpur : वाळूघाटासह गौणखनिज उत्खननावर आता ड्रोनद्वारे वॉच

Now watch by drone on minor mineral mining including Sand Ghat : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांची युक्ती

Nagpur नागपूर विभागात अनेक ठिकाणी अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. गौण खनिजाच्या अवैध उत्खननाचेदेखील प्रकार समोर आले आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी आता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुढाकार घेतला आहे. अवैध वाळू व गौण खनिजाच्या उत्खननावर आळा घालण्यासाठी व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी या दृष्टीने जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

वाळूघाट व गौण खनिजसंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत ४० वाळूघाट आहेत. या घाटावरून वाळूची तस्करी होत आहे. प्रशासनाकडून त्यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले आहे. ड्रोनद्वारे प्रत्यक्ष जागेवरचे फुटेज आपल्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर सप्रमाण गुन्हा सिद्ध करण्यासह अशा कारवाईतील पारदर्शकता वाढीस लागेल.

Bahujan samaj party: बसपाच्या नेत्याचे आवाहन, डुप्लिकेट नेत्यांपासून सावध रहा

याच बरोबर शासनाच्या कारवाई पथकाला सुरक्षित राहून यामार्फत पुरावे गोळा करता येतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वेळीच कारवाई करणे शक्य होईल. मनुष्यबळाच्या साहाय्याने तपासणीसाठी लागणारा वेळ आणि संसाधने ड्रोन तंत्रज्ञानातून मोठ्या क्षेत्राचे गतीने अचूक सर्वेक्षण करू शकतात. यात अचूकता असल्याने संबंधित गुन्हेगारांना वेगळा वचक निर्माण होईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

Brick kiln labourers : मजुराच्या मुलीने करून दाखवले!

ड्रोनच्या वापराने मोठ्या प्रमाणात यश मिळेल. वाळूघाटासमवेत अवैध खनिज उत्खननाला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड हेदेखील उपस्थित होते.