Breaking

Dnyaneshwar Dhane Patil : दोनवेळा आमदार होते, आता ठाकरेंची साथ सोडली

Big blow to Uddhav Thackeray group : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ज्ञानेश्वर धाने पाटलांचा उद्धव यांना धक्का

Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असताना शिंदेंच्या DCM EKnath Shinde शिवसेनेने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. दोनवेळा आमदार राहिलेले ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उद्धव यांची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील राजकारणात नवा टर्न आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील उद्धव ठाकरे पक्षाचे बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज, मंगळवार, दि. १० जूनला शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख व नगरसेवक सुनील राऊत, बडनेरा युवा सेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हाप्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवार, निलेश तिवारी, संतोष मनोहर, निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Eknath shinde : ही टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना

मागील अडीच वर्षांत केलेल्या कामांमुळे जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या निर्णयामुळे अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. धाने पाटील यांच्या या निर्णायामुळे अमरावतीचे राजकरण फिरले आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पोहोचणार बच्चू कडूंच्या आंदोलनात!

अमरावतीमध्ये ठाकरेंची ताकद खूपच कमी झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी संजय बंड आणि त्यांची पत्नी प्रिया बंड यांनीही उद्धव ठाकरे गटाची साथ सोडली होती, हे विशेष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाने पाटलांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.