Chief Minister Fadnavis intervenes, ‘that’ police officer is finally suspended : मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप, ‘ते’ पोलिस अखेर निलंबित
Mumbai : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूपूर्वी आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत जबाबदार पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या घटनेच्या चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे.
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. संपदा मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. याच ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. त्यांच्या हातावर आणि सुसाईड नोटमध्ये त्यांनी थेट दोन पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या मृत्यूला जबाबदार ठरवले आहे.
Bharat taxi seva : देशातील पहिली सहकारी ‘भारत टॅक्सी’ सेवा लाँच!!
सुसाईड नोटमध्ये डॉ. मुंडे यांनी नमूद केले आहे की, पीएसआय गोपाल बदने यांनी वारंवार अत्याचार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशामुळे सातारा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालय परिसरात नागरिक आणि वैद्यकीय कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. मुंडेंच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
Defender for MLAs : सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडरची दिवाळी भेट
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून तपशीलवार अहवाल मागवला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही सांगितले की, “या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. सातारा पोलिस अधिक्षकांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.”
local body elections : वंचितच्या किल्ल्यावर भाजपचा डोळा, आव्हान पेलवणार?
सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यालयाकडून स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. साताऱ्याच्या वैद्यकीय वर्तुळात आणि पोलीस दलात या घटनेमुळे भीषण अस्वस्थता निर्माण झाली असून, महिला सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार राज्यासाठी चिंताजनक ठरत आहे.
____








