Doctor suicide case : मृत्यूनंतरही फिंगर लॉक वापरून पुरावे डिलीट?

New sensational claim in female doctor’s death case : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक दावा

Beed : साताऱ्यातील फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या तळहातावरच सुसाईड नोट लिहून आपले आयुष्य संपवलं. या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. त्या दोघांकडून झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळूनच डॉक्टर तरुणीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं तिच्या लिखित सुसाईड नोटमधून उघड झालं. मात्र आता या प्रकरणात मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी नवा आणि गंभीर आरोप करत संशयाची नवी दिशा दाखवली आहे.

मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरचा मोबाईल फोन मृत्यूनंतर तीन वाजेपर्यंत सील करण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. पण तिच्या व्हॉट्सॲपवरील ‘लास्ट सीन’ची वेळ 11 वाजून 13 मिनिटांची दिसत आहे. त्यामुळे मधल्या वेळेत मोबाईल कोणी आणि का चालू केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असा संशय मृत तरुणीच्या चुलत बहिणीने व्यक्त केला आहे. “मोबाईल सील झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, पण त्या वेळेआधीच तो कोणी वापरला आणि नेमकं कोणत्या हेतूने, याचे पुरावे उपलब्ध नाहीत,” असं ती म्हणाली.

Maharashtra politics : ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने !

मयत डॉक्टरच्या आतेभावानेही गंभीर आरोप केला आहे. “आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने सर्व पुरावे नष्ट करून मगच पोलीसांकडे सरेंडर केलं,” असा थेट दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, आरोपींनी मृत डॉक्टरच्या मोबाईलचा फिंगर लॉक वापरून त्यातील महत्त्वाचा डेटा आणि पुरावे डिलीट केल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

घटनास्थळी पोहोचण्याआधीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आल्याचेही कुटुंबीयांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट स्पष्टपणे दिसत होती, तरीसुद्धा घटनेनंतर मोबाईलचा वापर आणि डेटा डिलीट झाल्याने संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर हे सध्या पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मयत डॉक्टर आणि आरोपी यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तसेच लोकेशन तपासले जात आहेत. या तपासातून दोघे एकाच ठिकाणी असल्याचे पुरावे मिळतात का, हे पाहण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे.

Formers battle : बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा !

या प्रकरणात कुटुंबीयांनी केलेल्या नव्या आरोपांमुळे आत्महत्येचं रहस्य अधिक गडद झालं आहे. पोलिसांकडून याप्रकरणी फॉरेन्सिक आणि डिजिटल पुरावे तपासण्याचे काम सुरू असून, नेमकं सत्य काय आहे, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.