Donald Trump : फोन कॉलवर बोलणं झाल्याच्या ट्रम्प यांचा दावा

Prime Minister Modi said that we have to stay together to fight terrorism. : पंतप्रधान मोदीं म्हणाले दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकत्र राहावं लागेल.

New Delhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचा दावा केला होता. आता पंतप्रधान मोदींनी स्वतः यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून ट्रम्प यांना थेट धन्यवाद दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधल्याचं सांगत, “मी आज नरेंद्र मोदींशी चर्चा केली. आमचं संभाषण अतिशय चांगलं झालं. आम्ही प्रामुख्याने व्यापार आणि आर्थिक विषयांवर बोललो,” असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यांनी पुढे दावा केला की, “भविष्यात भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणार नाही.”

Bacchu Kadu : याची बायकोच याच्या संघटनेत राहू शकत नाही; बच्चू कडूंनी डिवचले

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौम्य पण ठाम प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमच्या फोन कॉलसाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार. आपल्या दोन महान लोकशाही राष्ट्रांनी या प्रकाशोत्सवात जगाला आशेचा किरण दाखवला आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल.”

Mahavitaran : दिवाळीतच डिग्रस गावठाण अंधारात, नागरिकांचा संताप

दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत संवाद साधला असला तरी या चर्चेचा केंद्रबिंदू व्यापार आणि धोरणात्मक सहकार्यावरच होता. सध्या भारत-अमेरिका संबंधांमध्ये टॅरिफ आणि व्यापार करारासंबंधी ताण निर्माण झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्क्यांपर्यंतचा आयात शुल्क लावल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे.

तथापि, दोन्ही देशांनी परस्पर संवाद कायम ठेवत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संवाद हे भारत-अमेरिका संबंधांना नव्या दिशेने नेऊ शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

_____