Donald Trump vs elon Musk : मस्क यांनी व्यक्त केली खंत; पोस्ट करत सांगितले वाद खुपचं लांबला

Then would have lost the election, Trump also given a big threat : ‘तर ते निवडणूक हरले असते’, ट्रम्प यांनी पण दिली होती मोठी धमकी

New Delhi : गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क उघडपणे एकमेकांविरोधात बोलत होते, मात्र मस्क यांनी आता माफी मागितली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या आठवड्यात केलेल्या काही पोस्ट्सबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांविरोधात उघडपणे बोलत होते. इलॉन मस्क यांनीही ट्रम्प यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, पण आता ते माफी मागण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. इलॉन मस्कने एक पोस्ट शेअर केली आहे आणि जे काही झाले ते खूप होते, हा वाद खूपच लांबला असे म्हटले आहे. मस्क यांनी एका पोस्टमध्ये ट्रम्प यांच्यावर टीका केली होती आणि ‘ माझ्याशिवाय ते निवडणूक हरले असते’ असे म्हटले होते.

Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, राणेंनीच टोचले मुलाचे कान, मुख्यमंत्र्यांनीही खडसावले!

मस्क यांनी पोस्टच्या माध्यमातून आपल्या आधीच्या पोस्टबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, ‘मागील आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल शेअर केलेल्या काही पोस्ट्सबद्दल मला खेद वाटतो. गोष्टी खूप पुढे गेल्या.’ मस्कने गेल्या आठवड्यात अनेक धक्कादायक पोस्ट शेअर केल्या होत्या. ‘माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते’ असे त्यांनी ठासून सांगितले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प यांच्यावर अनेक गंभीर आरोप ही केले होते.

दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी पण त्याला तसेच उत्तर देत तिखट प्रतिक्रिया दिली, आणि मस्कच्या कंपन्यांना दिलेली सबसिडी आणि सरकारी कंत्राटे रद्द करण्याची धमकी दिली. त्याने आपले मतभेद जाहीरपणे कबूल केले आणि सांगितले, ‘एलॉन मस्क आणि माझे खूप चांगले संबंध होते. भविष्यात आमचे नाते चांगले राहील की नाही हे मला माहीत नाही. मी इलॉन मस्कबद्दल खूप निराश आहे. मी एलोनला खूप मदत केली आहे.’

Sanjay Raut on Ajit Pawar: तर.. आज अजित पवार उपमुख्यमंत्री झाले नसते!

बेकायदेशीर स्थलांतरितांवरील कारवाईविरोधात अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हिंसक निदर्शने पाहायला मिळात आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या दंगलखोरांवर आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर आणि लॉस एंजेलिसच्या महापौरांनाही माफी मागण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी 2 हजार नॅशनल गार्ड पाठवले. आहेत त्या मुळे आधीच परस्थिती चिघळलेली असताना. मस्क आणि ट्रम्प यांच्यात चांगलाच वाद रंगला. दरम्यान मस्क यांनी सबुरीचा मार्ग अवलंबला आहे. यामागे व्यावसायिक दृष्टिकोन असल्याची टीकाही होताना पाहायला मिळत आहे.