official withdrew ₹11 lakh from Gthe ram Panchayat’s account, while on leave : डाेणगाव येथील प्रकार, अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
Dongao डोणगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी व्ही. के. दांडगे हे ८ सप्टेंबर रोजी कौटुंबिक कारणास्तव रजेवर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत तात्पुरता प्रभार ग्रामपंचायत अधिकारी शरद वानखेडे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, दांडगे यांनी रजेवर असतानाच पंधरावा वित्त आयोगाच्या खात्यातून ११ लाख रुपये काढले आहेत. या प्रकरणाची चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शैलेस सावजी यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी आयसीआयसीआय बँक, मेहकर येथील खात्यातून ग्रामपंचायत अधिकारी दांडगे यांनी जवळपास ११ लाख रुपये एका दिवसातच काढल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
Waqf Amendment Act 2025 : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !
सुट्टीच्या कालावधीत अधिकाऱ्यांना निधी काढण्याचा अधिकार असतो का, असा सवाल सावजी यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, काढलेल्या रकमेचा उद्देश स्पष्ट करावा व आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सावजी यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.