Breaking

Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेत अधिकार्‍यांचे ‘प्रभारनाट्य’ !

Doubts on discharge of officials in Zilla Parishad : स्वेच्छेने राजीनामा की जाणीवपूर्वक बदली?; वेळेआधीच ‘मार्च एन्ड’चा अनुभव

Akola जिल्हा परिषदेतील अधिकारी आपल्या पदभारातून मुक्त होत असल्याने प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने पद सोडल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्यामागे संभाव्य चौकशी, प्रशासकीय दबाव आणि उच्चस्तरीय आदेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळे यांनी १४ फेब्रुवारी रोजी पदाचा प्रभार सोडला. मात्र, कारंजा रमजानपूर शाळा खोली बांधकाम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निर्णयाची चर्चा रंगली आहे. ३१ जानेवारीच्या अंकात या प्रकरणाविषयी प्रकाशित झालेल्या वृत्तात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संभाव्य कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे इंगळे यांनी अचानक पदभार सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, प्रभार काढल्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी कार्यालय सोडल्याचे समोर आले आहे.

Sanjay Raut on Neelam gorhe : नीलम गोर्हे या बाई नव्हे तर विकृत बाईमाणूस 

त्यामुळे या काळात त्यांनी कोणते निर्णय घेतले, हेही प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. याशिवाय, समाजकल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी हरिनारायण परिहार यांनीही आपला प्रभार सोडला. त्यांच्या निर्णयामागे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या निवडीतील वाद असल्याचे बोलले जात आहे.

मार्च महिना आर्थिक हिशेब निकाली काढण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र, अचानक बदल झाल्याने नव्या अधिकाऱ्यांना मोठ्या दबावाखाली काम करावे लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनेक विकासकामे मार्गी लावण्याचे नियोजन असते. मात्र, बदल झाल्याने काही अधिकाऱ्यांना अपेक्षित फायदे मिळाले नाहीत, तर काहींवर चौकशीचे संकट गडद झाले आहे. त्यामुळे ‘मार्च एन्ड’चा अनुभव काही अधिकाऱ्यांना फेब्रुवारीतच आला आहे.

Crime in Nagpur : गुंडासाठी पोलिसांवर हल्ला; साध्या वेषामुळे झाला गैरसमज

या घडामोडींमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील प्रभार बदलांवर करडी नजर ठेवली आहे. सूत्रांनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) स्वतः दिवसातून तीन-चार वेळा संबंधित विभागांची पाहणी घेत आहेत. अचानक केलेल्या बदलांमागचे खरे कारण लवकरच स्पष्ट होईल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.