Breaking

DPC Akola : अतिरिक्त निधीच्या मागणीला अजितदादा प्रतिसाद देतील?

Will minister respond to demand for additional funds? : जिल्हा वार्षिक योजना आराखड्यावर वित्तमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष

Akola राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार Ajit Pawar आज, ३ फेब्रुवारी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना आराखड्यावर राज्यस्तरीय बैठक घेणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासाठी मंजूर निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधी मिळावा, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विशेष मागणी करणार आहेत. लोकप्रतिनिधीच्या या अतिरिक्त निधीच्या मागणीला अजितदादा प्रतिसाद देणार का, या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

३१ जानेवारी रोजी अकोला नियोजन समिती (DPC) ची बैठक पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ३४३ कोटी ९६ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तथापि, विविध विकासकामांसाठी हा निधी अपुरा असल्याने अतिरिक्त निधीची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांसाठी किती अतिरिक्त निधी मंजूर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akola DPC : दलित वस्त्यांची कामे रद्द करण्यावरून राजकारण पेटणार

अतिरिक्त निधीची गरज का?

सार्वजनिक आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील प्रकल्प अपूर्ण आहेत.
पायाभूत सुविधांसाठी (रस्ते, पाणीपुरवठा, वीज) निधी कमी पडत आहे.
ग्रामीण भागातील विकास योजनांसाठी अधिक आर्थिक सहकार्याची गरज आहे.
नवीन औद्योगिक व कृषी प्रकल्पांना चालना देण्यासाठी निधी आवश्यक.

Chandrashekhar bawankule : नागपूर शहरातील निम्मे सीसीटीव्ही बंदच!

राज्यस्तरीय बैठकीत चर्चा होणारे संभाव्य मुद्दे

विकासकामांसाठी अतिरिक्त निधीची मागणी आणि मंजुरीची शक्यता.
प्रकल्प अंमलबजावणीचा आढावा आणि अडथळ्यांचे निराकरण.
वित्तीय नियोजन आणि निधी वितरणाची कार्यपद्धती.