Budget with emphasis on rural development : आशीष देशमुख म्हणतात, शेतकरी, महिला, रोजगारला प्राधान्य
Nagpur महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या वचननाम्याला अनुसरून राज्याचा हा अर्थसंकल्प आहे. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आखलेल्या योजनांसाठी आर्थिक तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. शेतकरी, महिला, रोजगार, उद्योगधंदे, कौशल्य विकास, पर्यटन, ग्रामीण विकास, क्रीडा, सिंचन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक विषयांवर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे, या शब्दांत भाजपचे सावनेरचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
विशेष करून विदर्भाच्या वाट्याला मोठ्या आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने याचा फायदा विदर्भाला नक्कीच होणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांपासून लाडक्या बहिणींपर्यंत सर्वांसाठी चांगल्या योजना, सिंचनाच्या दृष्टीने वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामसडक योजना यामध्ये आहेत.
Sanjay Raimulkar, Siddharth Kharat : क्रीडा संकुलाच्या निधीवरून नेत्यांमध्ये ‘कुस्ती’!
रोजगाराच्या दृष्टीने नवे उद्योग, ग्रामीण रस्ते, मेट्रोचे विस्तारीकरण, औद्योगिक धोरण 2025 अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगाराच्या निर्मितीचं लक्ष्य, 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट, मागासवर्गीय, दुर्बल घटक व आदिवासी विकास योजना, सर्वांसाठी घरे योजना, सौर कृषी वाहिनी योजना, गौ-विज्ञान अनुसंधान केंद्र याचाही समावेश आहे.
Maharashtra Water Department : थकबाकीमुळे पाणीपुरवठ्यावर संकट!
जलयुक्त शिवार अभियान, बचत गटांसाठी उमेद मॉल अशा अनेक योजनांमुळे हा अर्थसंकल्प नागपूर जिल्हा आणि विदर्भाच्या हिताचा तसेच पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.