Deputy Speaker of the Legislative Council directed strict action : नागपुरातील प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश
Nagpur उपराजधानीतील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अत्याचारी समुपदेशकाचे काळे कृत्य आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करत त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
विजय घायवट असे आरोपीचे नाव आहे. समुपदेशक म्हणून तो विविध जागी शिबिरे घेतो. तसेच तो समुपदेशनाच्या नावाखाली क्लिनिकदेखील चालवतो. नैराश्यात असलेल्या अनेक महिला-मुली त्याच्याकडे समुपदेशनासाठी येत होत्या. तसेच तो काही विद्यार्थिनींना मार्गदर्शनदेखील करायचा. त्याचा गैरफायदा उचलत त्याने अनेकींची छळवणूक केली.
Zilla Parishad Nagpur : आमचे सेटिंग नव्हते म्हणून निधी मिळाला नाही!
त्याने विद्यार्थिनी-महिलांचे व्हिडीओदेखील काढले होते व ते दाखवून तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. महिन्याभराअगोदर यातील एका पीडितेने त्याचा छळ असह्य झाल्याने पोलिस ठाणे गाठले व त्याचे काळे कृत्य समोर आले.
या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने या प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षापासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहेत.
Pramod Manmode : उद्धवसेनेच्या कार्यालयाकडे जिल्हाप्रमुखाचीच पाठ
याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व तातडीने चार्जशीट दाखल करण्याची दक्षता घ्यावी. साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याची कार्यवाही करावी. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक पावले उचलावी, असे निर्देश उपसभापतींनी दिले आहेत.