Newly appointed district president confident about winning local elections : डॉ. नितीन धांडे यांचा भाजप कार्यालयात पदग्रहण सोहळा
Amravati भारतीय जनता पक्ष अमरावती शहर जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन राजापेठ येथील भाजप कार्यालयात करण्यात आले. हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. डॉ. धांडे यांच्या नेतृत्वात आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीला बहुमत मिळेल आणि पुन्हा एकदा भगवा फडकेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला माजी खासदार नवनीत राणा, माजी शहराध्यक्ष प्रवीण पोटे पाटील, भाजप प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराज कुलकर्णी, ज्येष्ठ नेते किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, माजी महापौर संजय नरवणे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Political war begins : प्रकल्पाला मंजुरी मिळताच राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू
आपल्या अध्यक्षपदाच्या प्रारंभील भाषणात डॉ. नितीन धांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री आणि महसूलमंत्री यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. त्यांनी २०१७ मध्ये भाजपचे ४५ नगरसेवक निवडून आले असल्याची आठवण करून देत, आगामी निवडणुकीत किमान ५० पेक्षा अधिक नगरसेवक विजयी व्हावेत यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले.
CM Devendra Fadnavis : निवडणुका आल्या, जनता दरबारात गर्दी वाढली!
या कार्यक्रमाला माजी पक्षनेता सुनील काळे, माजी स्थायी समिती सभापती सचिन रासने, प्रदेश महामंत्री बादल कुलकर्णी, किसान मोर्चा प्रदेश महामंत्री ललित समदूरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कौशिक अग्रवाल, महिला मोर्चा अध्यक्ष गंगाताई खारकर आदी मान्यवर उपस्थित होते.