Breaking

Dr. Nitin Raut : ‘त्या’ विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा, माजी मंत्र्याची मागणी

Ex-Minister demands action against officials of Dr. Babasaheb Ambedkar Technological University : चुकीचे मूल्यमापन, प्रश्नपत्रिका फुटणे आदी प्रकार घडत असल्याचा आरोप

Nagpur राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील ढिसाळ कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. या विद्यापीठात सुरू असलेल्या प्रकारांसाठी येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे.

लोणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक ढिसाळपणा, चुकीचे मूल्यमापन, प्रश्नपत्रिका फुटी, वेळेत निकाल न लागणे आणि विद्यार्थ्यांना उपचारात्मक परीक्षा न देणे यामुळे येथील विद्यार्थी मानसिक व शैक्षणिक संकटात सापडले आहेत. विद्यापीठाच्या कारभाराची तात्काळ रीतसर चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Legislative Council Monsoon Session : विधान परिषदेतच जुंपली ‘ बाहेर ये तुला दाखवतो,’

राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये या विद्यापीठाशी जोडली गेली आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य विद्यापीठाच्या धोरणांवर अवलंबून आहे. मात्र ज्या उद्दीष्टासाठी विद्यापीठ स्थापन झाले होते ते पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व प्राध्यापकांकडून येत आहेत. नितीन राऊत यांनी या विद्यापीठातील कमतरतेवर प्रकाश टाकला. विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालते, मात्र बाबासाहेबांचे तत्त्व, मूल्ये आणि शिक्षणाचा अधिकार यांचा अवमान याठिकाणी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार स्वतः करणार जुनगाव पुरग्रस्त भागाची पाहणी !

विद्यापीठात परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही, निकाल वेळेवर लावले जात नाहीत. याठिकाणी वारंवार पेपर लीक होण्याच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ होत आहे. अपयशी विद्यार्थ्यांना सुधारात्मक परीक्षेची संधीही दिली जात नाही. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये असंतोष आणि नैराश्य वाढत आहे असल्याचे डॉ. राऊत यांनी सभागृहाला सांगितले. यावेळी इतर आमदारांनी देखील सदर विषयांवर राज्य शासनाकडून कारवाईची मागणी राऊत यांनी केली आहे.