Dr. Nitin Raut : ‘नमकहराम’ वरून भडकले काँग्रेसचे आमदार डॉ. राऊत !

 

PM Narendra Modi Should Clarify on Union Minister Giriraj’s Statement : केंद्रीय मंत्री गिरीराज यांच्या वक्तव्यावर मोदींनी द्यावे स्पष्टीकरण

Nagpur : आपल्या देशातील मुस्लीम केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेतात. पण आम्हाला मतं देत नाहीत, असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुस्लीम समाजाबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यांनी मुसलमानांना नकहराम असे म्हटले आहे. त्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीराज यांच्या त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

डॉ. राऊत यांनी आज (१९ ऑक्टोबर) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील सरकार हे एका पक्षाचे नसते तर ते संपूर्ण देशाचे सरकार असते. अशा प्रकारे देशातील एका समुदायाला अपमानीत करण्याचा अधिकार कुणालाही नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला आपले मत देण्याचा, ते प्रदर्शीत करण्याचा अधिकार आहे. मतं दिली नाहीत, म्हणून एका धर्माचा अपमान करणे कदापि योग्य नाही. अशा बेफाम सुटलेल्या मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी कारवाई केली पाहिजे.

Maharashtra politics : ठिकऱ्या फक्त गद्दारांच्या उडतील !

गिरीराज सिंह यांचे म्हणणे चुकीचे आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी मुस्लीम समाजाच्या लोकांनी मोदींना भरभरून मतं दिलेली आहे आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतं दिली नाहीत, म्हणून तुम्ही जर त्यांना नमकहराम म्हणणार असाल. हे योग्य नाही. असे म्हणण्याचा अधिकार तुम्लाला कुणी दिला, सवाल डॉ. राऊत यांनी केला. या देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर गदा आणू पाहणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे.